कोल्हापूर

चंदगड इंडस्ट्रीज झोन प्रश्नी मुख्यमंत्र्यांना निवेदन

CD

chd21.jpg
94182
मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना शिवाजीराव पाटील.
-----------------------
चंदगड इंडस्ट्रीज झोनप्रश्नी मुख्यमंत्र्यांना निवेदन
शिवाजीराव पाटील; रहिवासी झोन कायम करण्याची मागणी

चंदगड, ता. ३ ः येथील नगरपंचायत हद्दीतील प्रथमेशनगरचा परिसर शासनाने इंडस्ट्रीज झोन म्हणून राखीव ठेवला आहे, मात्र तीस वर्षांपासून या विभागात नागरी वस्ती असल्याने ही अट रद्द करून हा परिसर रहिवासी झोन म्हणून कायम करावा, अशी मागणी भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख शिवाजीराव पाटील यांनी केली आहे. इंडस्ट्री झोन हटाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
शहराच्या उत्तरेला बेळगाव-वेंगुर्ला मार्गाला संलग्न या परिसरात तीस वर्षांपासून नागरी वस्ती आहे. वाढती लोकसंख्या आणि विभक्त कुटुंब पद्धती यामुळे नागरिकांनी शहरापासून दूर असलेल्या प्रथमेशनगरमध्ये जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. यामध्ये शेतकरी, गवंडी, पंक्चरवाला, गाडी दुरुस्ती करणारे कारागीर अशा सर्वसामान्यांचा समावेश आहे. शहरातील बिगरशेती प्लॉट घेणे आणि नंतर घर उभारणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अनेकांनी लाखो रुपये खर्चून घरे बांधली आहेत. शेतीही केली जाते. असे असताना हा परिसर इंडस्ट्री झोन म्हणून राखीव केल्यास अनेकांची अडचण होणार आहे. प्रथमेशनगर हा भाग उंचावर असून, तेथे लोकवस्ती वाढण्यासाठी अनुकूल आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने इंडस्ट्री झोन रद्द करून तो रहिवासी झोन म्हणून कायम करावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सकारात्मक भूमिका घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी इंडस्ट्री झोन हटाव कृती समितीचे अध्यक्ष रणजित गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT