कोल्हापूर

मृत्यु झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाना होणार हस्तांतरीत

CD

मृत मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना आता वारसांना
कार्यवाही सुरू : वारसांना सहा महिन्यांच्या आत करावा लागणार अर्ज
प्रवीण देसाई : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : कोरोना आजारासह नैसर्गिक व अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना आता वारसांना हस्तांतरित होणार आहे. याबाबतचा महत्त्‍वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक वारसांना दिलासा मिळाला आहे. याबाबतची कार्यवाही जिल्हा मुद्रांक कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयापासून सहा महिन्यांच्या आत संबंधितांनी अर्ज सादर करायचा आहे.
काही वर्षांपूर्वी बनावट मुद्रांक विक्रीचे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून मुद्रांक विक्रीची खासगी वितरण व्यवस्था कमी करून पोस्ट खाते व बँकांमार्फत मुद्रांक वितरण व्यवस्था राबविण्यात येत आहे. तसेच पारंपरिक खासगी मुद्रांक विक्रीचे नवीन परवाने देण्यास सरकारने स्थगिती दिली. त्याचबरोबर खासगी व्यक्तींना अधिकृत मुद्रांक विक्री परवाने न देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे; परंतु कोरोना काळात मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांच्या उपजीविकेचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावर अनेक आमदारांनी विधिमंडळामध्ये मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने हस्तांतरित करावेत, अशी मागणी केली. यासाठी लेखी निवेदनेही सादर केले. त्याची दखल घेत सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना तसेच नैसर्गिक व अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने हस्तांतरित करण्याचा निर्णय नुकताच घेतला. तसेच त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देशही जिल्हा मुद्रांक विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
...
वारसांना लागणार ही कागदपत्रे
- मुद्रांक विक्रेत्याच्या मृत्यूच्या कारणाची नोंद असलेले शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र वारसांना सादर करावे लागणार.
- परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा अधिकृत वारसदार म्हणजे पती, पत्नी, मुलगा, मुलगी, मुलाची विधवा पत्नी, नातू व नात असावी. त्याबाबत त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार.
- परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा वारस हा सज्ञान असावा.
- ज्या वारसास परवाना हस्तांतरण करावयाचा आहे, तो सुशिक्षित असावा. तो किमान १० वी पास असावा.
- वारसांसाठी पोलिसांकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक.
...
कोट...
‘कोरोना आजारासह नैसर्गिक व अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांचे मुद्रांक परवाना वारसांना हस्तांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय झाल्यापासून सहा महिन्याच्या आत वारसांनी अर्ज करून संबंधित कागदपत्रे जमा करायची आहेत. जिल्हा मुद्रांक विभागाला अर्ज व आवश्‍यक कादगपत्रे सादर केल्यानंतर सात दिवसांत परवाने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तरी संबंधितांनी तत्काळ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
- बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT