क्रिएटीव्हमध्ये कार्यशाळा
गडहिंग्लज ः येथील क्रिएटीव्ह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्युत उपकरण सुरक्षितता कार्यशाळा उत्साहात झाली. वीज महावितरण कंपनीचे यासाठी सहकार्य मिळाले. कार्यशाळेत पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे उद्भवणाऱ्या विजेशी संबंधित समस्या, विद्युत उपकरणांची हाताळणी व काळजी याबाबत विद्युत अभियंता वाघ, उपअभियंता सूर्यंवंशी, श्रीपाद चिकोडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
...
शिवराज फार्मसीचे यश
गडहिंग्लज ः येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचा प्रथम व द्वितिय वर्षाचा निकाल लागला. प्रथम वर्षात मानसी पालंडे ७६.७० टक्के, सानिया माणगावकरने ७२.७० तर सुमित्रा गावडे ६९ टक्के गुण घेवून यश मिळविले. द्वितीय वर्षातील प्राजक्ता कोकीतकरने ८२.६४, सुस्मिता गडदावर ८१.०९ तर दिव्यश्री डंगी हिने ८०.८२ टक्के गुण घेवून चांगले यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.