94302
कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना त्वरित दाखले द्यावेत, या मागणीसाठी मनसेतर्फे करवीर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. (नितीन जाधव : सकाळ छायायित्रसेवा)
उत्पन्न, रहिवासी दाखले
त्वरित देण्याची मागणी
करवीर तहसील कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत कमी कालावधी आहे. उत्पन्न आणि रहिवासी दाखले मिळताना विलंब होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ते त्वरित देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यापुढेही तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला.
निवेदनात म्हटले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पंधरा दिवसांच्या मुदतीत उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट महिलांना त्वरित मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हा दाखला त्वरित देण्यासाठी अव्वल कारकून, नायब तहसीलदारांना सूचना द्याव्यात. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू. यावेळी तहसीलदार रावडे यांनी वेळेत दाखले दिले जातील, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. यावेळी अभिजित पाटील, अमित साळोखे, अरविंद कांबळे, संजय चौगुले, नीलेश आजगावकर, सुनील तुपे, राजन हुलोळी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.