कोल्हापूर

सकाळ नाट्य महोत्सव

CD

महोत्सवाचा लोगो, क्यूआर कोड आजच्या बातमीतून
-------
सकाळ नाट्य महोत्सव आजपासून
तिकिटे नाट्यगृहावर उपलब्ध : ‘गेला माधव कुणीकडे’चा आज प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : चितळे डेअरी प्रस्तुत सकाळ नाट्य महोत्सवाच्या तिकिटांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. उद्या (बुधवारी) या दोन दिवसीय महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी ‘गेला माधव कुणीकडे’ आणि गुरुवारी (ता. ४) ‘नियम व अटी लागू’ या नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सव्वासात वाजता प्रयोग होतील. दरम्यान, बटू बिल्डर्स आणि निलकमल फर्निचर्स या महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.
प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्षे रसिकांचे मनोरंजन केले. मात्र, गेली काही वर्षे नाटकाचे प्रयोग बंद होते. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित हे नाटक आता पुन्हा रंगमंचावर आले आहे.
‘नियम व अटी लागू’ हे कौटुंबिक विनोदी नाटक असून, नाटकात अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असून, संगीत अशोक पत्की यांचे आहे. संकर्षण कऱ्हाडे यांचेच लेखन असून, नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे.
...
असा होईल महोत्सव...
० बुधवार (ता. ३) : ‘गेला माधव कुणीकडे’
० गुरुवार (ता. ४) : ‘नियम व अटी लागू’
० स्थळ : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. वेळ : सायंकाळी सव्वासात
० ऑफलाईन तिकीट विक्री नाट्यगृहावर उपलब्ध
० ऑनलाईन तिकिटांसाठी लिंक : http://www.ticketkhidakee.com/sakalnatyamahotsav आणि www.ticketalay.com

० फोन बुकिंगसाठी संपर्क : ९५६१६२६६६३
...
कोट
‘सकाळ’च्या महोत्सवामुळे कोल्हापूरकरांना दर्जेदार नाटकांची पर्वणी मिळते आहे. ग्राहकांकडूनही आम्हाला याबाबतच्या चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या महोत्सवाचा एक भाग असल्याचा नक्कीच आनंद आहे.
- अभिजित गायकवाड, बटू बिल्‍डर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT