कोल्हापूर

निधन वृत्त

CD

सिंगल वापरा
05818
दीराच्या रक्षाविसर्जनदिनी
नाधवडेत भावजयीचे निधन
कोनवडे : दीराच्या अचानक मृत्यूचा जबर धक्का बसल्याने २४ तास उलटण्याआधीच दिराच्या रक्षाविसर्जनदिनीच सख्ख्या भावजयीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नाधवडे (ता. भुदरगड) येथे घडली. मिळालेली माहिती अशी, नाधवडेचे माजी उपसरपंच विठ्ठल पांडुरंग पाटील (वय ५२) यांचे गुरुवारी (ता. २७) दुपारी निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २८) झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यातच शुक्रवारी विठ्ठल यांची भावजय आनंदी नानासो पाटील (वय ५६) यांच्या छातीत दुखू लागले. चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवले; मात्र त्यांचे निधन झाले.
------------

94375
प्रकाश माने
कोल्हापूर : कसबा बावडा, माने गल्ली येथील प्रकाश आनंदराव माने (वय ५४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) कसबा बावडा स्मशानभूमी येथे आहे.

94376
सुमन पुजारी
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील सुमन बसाप्पा पुजारी (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

04615
लक्ष्मीबाई सावेकर
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील लक्ष्मीबाई बापूसो सावेकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

03545
गोपाळ सुतार
राशिवडे : पुंगाव (ता. राधानगरी) येथील गोपाळ ज्ञानू सुतार (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

04458
शामराव देवर्डेकर
सरवडे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील शामराव दत्तात्रय देवर्डेकर (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

01982
दिलीप पडियार
वडणगे : गोसावी वसाहत येथील दिलीप शिवाजी पडियार-गोसावी (वय ३२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) आहे.

04378
पांडुरंग शिंत्रे
उत्तूर ः बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथील पांडुरंग नाना शिंत्रे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा व जावई असा परिवार आहे.

01949
किरण शिर्के
बाजारभोगाव ः पिशवी (ता. शाहूवाडी) येथील किरण प्रकाश शिर्के (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मोठा परिवार आहे.

01809
बाळू पाटील
साळवण : निवडे (ता .गगनबावडा) येथील बाळू गणपती पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) आहे.

03041
भुजिंगा सुतार
खोची ः येथील भुजिंगा बाबू सुतार (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे

03039
आप्पासाहेब पाटील
खोची ः येथील आप्पासाहेब बाळासाहेब पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, दोन भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

08108
संताजीराव निंबाळकर
कंदलगाव : राजारामपुरी १२ वी गल्लीतील संताजीराव पिराजीराव निंबाळकर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

02297
सागर चौगले
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील सागर सुरेश चौगले (वय ३४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, चुलती, चुलतभाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

05816
दत्तात्रय देसाई
कोनवडे : हेदवडेपैकी गिरगाव (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय ईश्वरा देसाई (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, नातवंडे, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

01833
नामदेव तळस्कर
पट्टणकोडोली : येथील नामदेव गोविंद तळस्कर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे व जावई असा परिवार आहे.

02638
पार्वती माने
कसबा बीड ः येथील पार्वती प्रकाश माने (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

02396
सुधाबाई साळोखे
पिंपळगाव ः नागणवाडी (ता. भुदरगड) येथील सुधाबाई बाबूराव साळोखे (वय ८५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT