कोल्हापूर

इचल : मुख्य अंकासाठी

CD

अतिरिक्त वीज सवलतीसाठी नोंदणीची अट रद्द
आमदार आवाडेंचा पाठपुरावा ः राज्यातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा

इचलकरंजी, ता. २ ः प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली, २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागासाठी एक रुपया अतिरिक्त वीज सवलतीसाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग यांना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अधिवेशनात सांगितले.
यामुळे इचलकरंजीसह राज्यातील यंत्रमागधारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त वीज सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने यंत्रमागधारकांच्या अडचणी वाढतच होत्या. वीज सवलत मिळण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने ऑनलाईन नोंदणीची अट घातली होती. ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने ती रद्द करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला होता. याच संदर्भात अधिवेशनात सोमवारी आमदार आवाडे यांनी पुन्हा प्रश्‍न उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले हते.
अधिवेशनाच्या आजच्या कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यामध्ये अतिरिक्त वीज सवलतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेतील चर्चेवेळी अतिरिक्त वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिवांना दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर सवलतीचा लाभही तातडीने देण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT