कोल्हापूर

गड- कोयत्याने हल्ला

CD

ग्रिसिंग व्यवसायातून
एकावर प्राणघातक हल्ला
गडहिंग्लजमधील घटना : हनिमनाळचा एकजण गंभीर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : ग्रिसिंग व्यवसायाच्या वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले. सोमवारी (ता. २१) रात्री सव्वा नऊच्या सुमारास शेंद्री रोडवर ही घटना घडली. राजेंद्र बाळासाहेब कुंभार (वय ३२, रा. हनिमनाळ, ता. गडहिंग्लज) असे जखमीचे नाव आहे.
या प्रकरणी अरुण संकपाळ (रा. कडगाव रोड, गडहिंग्लज), प्रशांत संकपाळ (हडलगे, ता. गडहिंग्लज) यांच्यासह अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्या भारतीय न्यास संहिता कलमानुसार जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाबद्दल हा पहिलाच गुन्हा येथे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची अधिक माहिती अशी, संशयित अरुण व जखमी राजेंद्र यांचा ग्रिसिंगचा व्यवसाय एकमेकांच्या शेजारीच सुरू आहे. या व्यवसायातून दोघांत वाद आहे. येथे व्यवसाय करू नये म्हणून अरुण हा राजेंद्रशी नेहमी भांडण काढायचा. दरम्यान, सोमवारी (ता. १) रात्री शेंद्री रोडवरील कॉर्नरला शेरी ओढ्याजवळ याच कारणावरून दोघांत वाद झाला. तेव्हा ‘तुला मस्ती आली आहे, तुला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत अरुणने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने राजेंद्रच्या उजव्या हातावर व मानेवर तर प्रशांतने कोयत्यानेच त्याच्या डाव्या हातावर व डोक्यात जोराने वार केले. त्यात राजेंद्र रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. रात्री उशिरा अरुण, प्रशांत व त्यांच्या दोघा साथीदारांना ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी सांगितले. याप्रकरणी उत्तम कुंभार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
दुंडगेचा युवक ताब्यात
गडहिंग्लज, ता. २ : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील शिवराज देसाई (वय १९, रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली. ही घटना अंदाजे पाच मे रोजी घडल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, देसाई व पीडित मुलगी एकाच महाविद्यालयात शिक्षणाला आहेत. ते एकमेकांचे मित्रही आहेत. दरम्यान, भडगाव रोडवरील एका कॅफेमध्ये कॉफी घेण्यासाठी जाऊया, असे म्हणून देसाईने त्या मुलीला तेथे नेले. त्याच ठिकाणी तिच्यावर त्याने अत्याचार केले. दरम्यान, या घटनेतील कॅफे चालकावरही गुन्हा दाखल करणार असल्याचे तपासी अधिकारी सरगर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT