फोटो
...
पाचवी, आठवी शिष्यवृत्तीत कोल्हापूरची आघाडी
सिद्धेश आंबेकर, पियुष पाटील द्वितीय; राज्याच्या गुणवत्ता यादीत ८३ विद्यार्थी चमकले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवी (पूर्व माध्यमिक शाळा) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. त्यात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ८३ विद्यार्थी चमकले आहेत. त्यात पाचवी (ग्रामीण विभाग) मध्ये पियुष संभाजी पाटील (विद्यामंदिर खामकरवाडी, ता. राधानगरी), सिद्धेश शैलेश आंबेकर (केंद्रशाळा तारळे खुर्द, ता. राधानगरी) यांनी ९६.६४ टक्के गुणांसह राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये शहर विभागात कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामध्ये आराध्या विकास पाटील, मृणाली सचिन जाधव, (लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय), हर्षदा किशोर सुतार (टेंबलाईवाडी विद्यालय) यांचा समावेश आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. राज्य गुणवत्ता यादीतील गुणवत्ताधारकांपैकी १९ टक्के विद्यार्थी कोल्हापूरचे आहेत. इयत्ता पाचवीच्या परीक्षेची जिल्ह्याची टक्केवारी ३८.९६, तर आठवीची टक्केवारी २६.७१ इतकी आहे. या दोन्ही परीक्षेत शहर आणि ग्रामीण विभागातील एकूण ८३ विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे. त्यात शिवम कुदळे, वरद पाटील, आराध्या उत्तम पाटील, स्वरांजली करवाळ, स्वरा पाटील, आराध्या संजय पाटील, चिन्मयी थोरवत (पाचवी ग्रामीण), अथर्व हासबे, रोहित पाटील, अनुष्का पोटे, श्रेया माळी, राजवर्धन पाटील, स्मिता रेडेकर (आठवी ग्रामीण) आदींचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
...
ग्रामीण विभागात ‘भुदरगड’ अव्वल
जिल्ह्यात पाचवी, आठवीचे एकूण ११६२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांत सर्वाधिक १५६ विद्यार्थी भुदरगड तालुक्यामधील आहेत. त्यापाठोपाठ कागल तालुक्याचे १३९, तर राधानगरी तालुक्यातील १२४ विद्यार्थी आहेत. राज्याच्या निकालाच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालाची सरासरी अधिक असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.
...
शहरी विभागात महापालिका शाळांचे यश
शहरी विभागामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या शाळांतील एकूण १७४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी सांगितले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळेतील एकूण ८२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
...
राज्याच्या गुणवत्ता यादीतील कोल्हापूरचे विद्यार्थी
इयत्ता पाचवी ग्रामीण -२८
इयत्ता पाचवी शहरी-१६
इयत्ता आठवी ग्रामीण-२६
इयत्ता आठवी शहरी-१३.
...
तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
भुदरगड (१५६), कागल (१३९), राधानगरी (१२४), करवीर (९४), आजरा (७८), गडहिंग्लज (७६), शिरोळ (७४), हातकणंगले (५०), चंदगड (४५), शाहूवाडी (३३), पन्हाळा (२६), गगनबावडा (११).
...
निकालाची टक्केवारी
इयत्ता* राज्याची टक्केवारी* कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी
पाचवी*२४.९१*३८.९६
आठवी*१५.२३*२६.७१.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.