कोल्हापूर

सीपीआर एमआरआय सुविधा

CD

...अखेर ‘सीपीआर’ला
मिळणार एमआरआय मशीन
मंत्री मुश्रीफ यांचा पाठपुरावा; २६ कोटींचे अनुदान मंजूर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : सीपीआर रुग्णालयात उपचाराला येणाऱ्या दुर्बल घटकांतील रुग्णांना ‘एम. आर. आय.’ चाचणीअभावी उपचार सेवेतील अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय विचारात घेऊन दैनिक ‘सकाळ’मधून ‘सीपीआर’मध्ये एम. आर. आय. सुविधा हाोण्यासाठी वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या निर्णायक पाठपुराव्यानंतर आज सीपीआरला ‘एमआरआय’ खरेदीसाठी २६ कोटींचे अनुदान मंजूर झाल्याचे पत्र आले. त्यामुळे ‘सीपीआर’मध्ये असुविधेंमुळे होणारे रुग्णांचे दुर्लक्ष थांबण्यास आता मदत होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ यांना ‘सीपीआर’मधील एम. आर. आय. सुविधांचा अभाव याविषयी विचारणा केली होती. त्यानंतर एम. आर. आयची आठवण देणाऱ्या बातम्या वेळोवेळी प्रसिध्द केल्या. त्यानंतर सरकारचा कार्यकाल पूर्ण होत आला तरीही एम. आर. आय. सुविधा झालेली नाही, याबाबत दैनिक ‘सकाळ’मधून वृत्ताद्वारे लक्ष वेधण्यात आले होते.
याची वैद्यकीय शिक्षण खात्याने तातडीने दखल घेतली त्यानंतर मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा झाला. अखेर आज सीपीआरला एम. आर. आय खरेदीसाठी २६ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर झाल्याचे पत्र आले.
या पत्रातील आदेशात सीपीआरला एम. आर. आय मशीन खरेदीसाठी २६ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात येत आहे. यात सर्व करासह खर्च टर्न की तत्त्वावर खर्च अपेक्षित धरला आहे. या अनुदानास प्रशासकीय मान्यता देताना यंत्र खरेदीचा दर हा अंदाजित आहे. या यंत्रसामग्रीसाठी नवीन पद भरती किंवा निर्मितीची आवश्यकता नसावी, असे म्हटले आहे. हे पत्र आज दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाले.
-----------------------
कोट
‘सीपीआर’ला एम. आर. आय. मशीन घेण्यासाठी २६ कोटींचे अनुदान मंजूर झाल्याचे पत्र मिळाले आहे. यापुढे ई-निविदा प्रक्रिया होईल. त्यानंतर ज्या कंपनीला मशीन पुरवठा करण्याचा ठेका मिळेल त्यांच्याकडून ते मशीन बसविले जाईल. या सर्वासाठी प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे तीन-चार महिन्यांचा कालावधी लागेल.
- डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT