कोल्हापूर

‘केएमटी’ची ओव्हर टाईम ड्युटी पुर्ववत सुरु ठेवावी : म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनची मागणी

CD

‘केएमटी’ची ओव्हर टाईम ड्यूटी
पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : ‘केएमटी’ची ओव्हर टाईम ड्यूटी पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनतर्फे आज महापालिका उपायुक्त पंडित पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, १ एप्रिल २०२३ पासून शासन नियमानुसार कालबाह्य झालेल्या सुमारे ५४ बसेस स्क्रॅप कराव्या लागल्या. त्यामुळे उरलेल्या ६० बसेसमध्ये प्रवासी लोकांना सेवा देणे क्रमप्राप्त होते. बसेस स्क्रॅप होण्यापूर्वी दुपारी १२.३० ते १५.३० पर्यंत ५४ बसेस वाहतूक नियंत्रण कक्ष येथे थांबून राहत होत्या. १८ नाईट हॉल्टच्या बसेस वर्कशॉप येथे जमा होत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे दुपारच्या वेळेत अतोनात हाल होत होते. मुळात ही परिवहन सेवा प्रवासी लोकांसाठी आहे. प्रवाशांची गैरसोय पाहता थांबणाऱ्या बसेस सुरू राहाव्यात, यासाठी मोटार वाहन कायद्यातील ‘ओव्हर टाईम’ या तरतुदीचा वापर करून या बसेस मार्गस्थ केल्या. यासाठी प्रशासनाने रितसर ‘ओव्हर टाईम’चे प्रसिद्धीकरण करून ज्या चालक वाहक कर्मचाऱ्यांनी अर्जाद्वारे ओव्हर टाईम ड्यूटी मागणी केलेली आहे. त्यांना ज्येष्ठतेनुसार या ड्यूटी लावण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांवर सक्ती केलेली नाही. तसेच आमच्या संघटनेने ‘ओव्हर टाईम’बाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. काही जणांनी संघटनेची बदनामी करत आहेत, ते चुकीचे आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष मनोज नार्वेकर, खजानीस राजेंद्र वडर आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT