कोल्हापूर

शहरातील कचरा उठाव ठप्प

CD

शहरातील कचरा उठाव ठप्प
झूम प्रकल्पाजवळ रस्ता खचला; चार तास टिप्पर अडकले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : लाईन बाजार येथील महापालिकेच्या झूम प्रकल्पातील कचरा नेण्यासाठी मंगळवारी वर्कशॉप विभागाकडून जेसीबी उपलब्ध नसल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचले. तसेच येथील रस्ता खचल्याने सकाळी टिप्परमधील कचरा टाकण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे चार ते पाच तास या ठिकाणी टिप्पर अडकून पडल्या. परिणामी शहरातील उठाव ठप्प होऊन नागरिकांची गैरसोय झाली.
महापालिकेकडून शहरात टिप्परच्या माध्यमातून नागरिकांच्या थेट घरातून कचरा गोळा केला जातो. त्यानंतर हा कचरा लाईन बाजार येथील झूम प्रकल्प येथे नेऊन टाकला जातो. मंगळवारी झूम प्रकल्पाच्या ठिकाणी रस्त्यावरच पडलेला कचरा हटविण्यासाठी वर्कशॉप विभागाकडून जेसीबी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग जसेच्या तसे राहिले. त्याच दरम्यान प्रकल्पाकडे जाणार रस्ता ही पावसामुळे खचला. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकायला येणाऱ्या टिप्पर रस्त्यावरच अडकून पडल्या. तब्बल चार ते पाच तास त्या रस्त्यावरच थांबून राहिल्या.
-------------
चौकट
टिप्परची एकच फेरी
दरम्यान, दुपारनंतर हळूहळू टिप्परद्वारे कचरा टाकण्यास सुरुवात झाली. याला खूप उशीर झाल्याने टिप्परची दुसरी फेरी होऊ शकली नाही. त्यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी टिप्पर न आल्याने कचरा उठाव ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT