कोल्हापूर

क्रीडा आयुक्तांसोबत लवकर बैठक घेऊ

CD

94616
कोल्हापूर ः क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र पूर्ववत करावे, या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी बुधवारी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
....................
क्रीडा आयुक्तांसोबत लवकर बैठक घेऊ

निवासी फुटबॉल केंद्रप्रश्नी क्रीडामंत्र्यांची आमदार जाधव यांना ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ‘क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र येथे पूर्ववत सुरू करावे,’ अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली. याबाबत क्रीडा आयुक्तांसोबत लवकर बैठक घेऊ, असे आश्‍वासन मंत्री बनसोडे यांनी दिले.
संस्थान काळापासून कोल्हापूरकरांच्या नसानसात फुटबॉल खेळ रुजला आहे. या खेळाला राजाश्रयासोबत आता लोकाश्रयही मिळाला आहे. फुटबॉल कोल्हापूरची अस्मिता बनली आहे. प्रत्येक नागरिकाच्या हृदयात फुटबॉल खेळालाही स्थान आहे. येथे फुटबॉलची गुणात्मक व संख्यात्मक वाढ व्हावी. या उद्देशाने १९९६ मध्ये तत्कालनी सरकारने क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती व फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली. त्यानंतर काही दिवस हे प्रशिक्षण केंद्र सुरळीत सुरू होते. मात्र, काही दिवसांनंतर ते कोणालाही समजण्याच्या आत पुण्याला हलविले. त्यामुळे तंत्रशुद्ध फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या खेळाडूंना पुण्यास जावे लागणार आहे. हा इथल्या स्थानिक खेळाडूंवर अन्याय आहे. फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरची राज्यासह देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. खेळाडूंनी देशभरात नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी येथील क्रीडा प्रबोधिनीचे फुटबॉल केंद्र पूर्ववत सुरू करावे. यासंदर्भात ‘खेळ कोल्हापुरात अन् फुटबॉल केंद्र पुण्यात’ असे वृत्त ‘सकाळ’मध्ये मंगळवारी (ता. २) प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत आमदार जयश्री जाधव यांनी क्रीडामंत्री बनसोडे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

Mumbai News: कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने! वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT