कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात राबविणार व्यापक वृक्षारोपण मोहीम

CD

शिवाजी विद्यापीठ राबविणार
व्यापक वृक्षारोपण मोहीम
‘एनएसएस’चे अकरा हजार स्वयंसेवक सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शिवाजी विद्यापीठातर्फे जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपण मोहीम जुलैमध्ये राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव आणि जागृती निर्माण करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (एनएसएस) सहकार्याने चार लाख २३ हजार २८५ रोपांची लागवड केली जाणार आहे. या मोहिमेमध्ये ‘एनएसएस’चे अकरा हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
विद्यापीठाचा एनएसएस विभाग, जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत शासनातर्फे गायरान, पडिक जमीन तसेच शासनाच्या अखत्यारीत असणारी इतर वृक्ष लागवड योग्य जमिनीवर वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत लावण्यात येणारी सर्व रोपे ही देशी वाण या प्रजातीच्या असणार आहेत. त्यामध्ये आंबा, जांभूळ, वड, पिंपळ, लिंब, करंज, हिरडा, बेरडा, चिंच, कडुलिंब, बाभूळ, पळस, भोकर, आवळा, साग, ऐन, अर्जुन व इतर स्वदेशी वाणांचा समावेश आहे. शासनाच्या वनधोरणास अनुसरून परिसरनिहाय वृक्षारोपण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी. त्यांच्या रहिवासी क्षेत्राजवळ वृक्षारोपण होत असल्यामुळे त्या वृक्षांची काळजीपण हे विद्यार्थी घेतील, अशी अपेक्षा असल्याची माहिती एनएसएस विभागप्रमुख तानाजी चौगुले यांनी दिली. शिवाजी विद्यापीठ एन. एस. एस. विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे.
...
कोट
‘प्रशासनातर्फे सर्व ठिकाणी खड्डे काढून तसेच रोपवाटिकांमधून आवश्यक ती सर्व रोपे या मोहिमेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण बदल, शाश्वत विकास याची दृष्टी निर्माण व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
- सिद्धार्थ शिंदे, व्यवस्थापन सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT