कोल्हापूर

पोलिसवृत्त

CD

दौलतनगरात एकास मारहाण
कोल्हापूर : दौलतनगरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या मारहाणीत अर्जुन मनोहर शिंदे (वय ३२, मूळ रा. वाकरे फाटा, करवीर) जखमी झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला पहाटे उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली.
...
विषारी द्रव प्यायलेल्या
वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर : विषारी द्रव प्यायल्याने प्रकृती गंभीर बनलेले निजाम काशीम ताशिलदार (वय ६६, रा. ऐनापूर, गडहिंग्लज) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास राहत्या घरी विष प्यायल्याने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारानंतर सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
...
मारहाणीत मायलेक जखमी
कोल्हापूर : गांधीनगर इंदिरा वसाहतीत झालेल्या भांडणात जखमी झाल्याने मायलेकीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पूजा केदार बन्ने व सोनाली केदार बन्ने अशी जखमींची नावे आहेत. दोघींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
...
धक्का लागल्याने
हातोडीने मारहाण
कोल्हापूर : गल्लीमध्ये खेळताना धक्का लागल्याच्या रागातून काशिनाथ राजू कांबळे (वय १९, रा. विचारेमाळ) याला हातोडीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी फिरोज सय्यद उर्फ हँग फिरोज (रा. शाहू कॉलेजजवळ) याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT