कोल्हापूर

‘प्रोटोकॉल’मध्ये घसरतोय ‘जल जीवन’चा दर्जा

CD

जल जीवनचा लोगो वापरणे....
....................................

‘प्रोटोकॉल’मध्ये घसरतोय ‘जल जीवन’चा दर्जा

गावकारभाऱ्यांना योजनेच्या कामाकडे द्यावे लागणार लक्ष

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची देखरेख करण्यासाठी त्रिसस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने गावागावांतील कामांची देखरेख वेळेत आणि अपेक्षितरीत्या होते का, याकडे लक्ष द्यायला हवे. दरम्यान, ज्या गावात जल जीवन मिशन योजना सुरू आहे, त्या गावातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य वगळता इतरांनी ‘प्रोटोकॉल’शी मतलब ठेवला आहे. ‘प्रोटोकॉल’मुळे अनेक गावांमधील जल जीवन मिशनचा दर्जा ढासळला जात असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील १२७० योजनांसाठी १३६० कोटींचा निधी दिला जाणार आहे. या निधीचा योग्य वापर झाल्यास निश्‍चितपणे गावांना फायदा होणार आहे. मात्र, गावकारभाऱ्यांना ‘प्रोटोकॉल’ देऊन योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या भाग पाडले जात आहे. आपल्या गावातील योजना चांगल्या दर्जाची व्हावी, पाण्याची टाकी, पाईपलाईन, वीजपंप हे आराखड्यानुसारच घेतले जावेत. पाईपलाईन सुरू करण्यासाठी केलेल्या सर्व्हेनुसार त्याचे काम योग्य पद्धतीने व्हावे. यासाठी गावकारभारी आग्रही असणे गरजेचे आहे. मात्र, योजनेला किती निधी मिळणार आणि त्यातून आपल्याला ‘प्रोटोकॉल’ किती मिळणार यावरच जास्त भर दिला जात आहे. त्यामुळे ज्या ग्रामस्थांनी सदस्यांना निवडून दिले आहे, त्या लोकांचा अपेक्षाभंग होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
जल जीवनची कामे दर्जेदार आणि आराखड्यानुसार होतात का, याची माहिती घेऊन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन अहवाल तयार करावा लागतो. आराखड्यातील सर्व्हेनुसार पाईपलाईन घातलेली दिसत नाही. पूर्णत्वास किंवा ६० टक्के पूर्ण झालेल्या योजनांना मोठमोठी गळती लागलेली दिसून येत आहे. त्याची दुरुस्ती किंवा भविष्यात अशी गळती होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली हे स्पष्ट नाही. गळती सुरू झाल्यानंतर त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. मात्र, त्रिसस्तरीय समितीच्या तपासणीत ही बाब दिसून येते की नाही? हा सवाल आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील या योजना सक्षमपणे झाल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आणि जिल्हा परिषदेची आहे. मात्र, गावपातळीवर या योजनांमध्ये अनेक त्रुटी राहात असतानाही ‘प्रोटोकॉल’मुळे गावकारभाऱ्यांचा आवाज दाबला गेल्याचे दिसून येत आहे.
......
कोट...
जल जीवन मिशनमधून सुरू असणाऱ्या योजना चांगल्या आहेत. त्यासाठी शासनाने चांगला निधीही दिला आहे. मात्र, कामाच्या दर्जाबाबत शंका घेतली जात आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्यांच्या ही बाब निदर्शनास येत आहे. मात्र, ‘प्रोटोकॉल’ देऊन तोंड बंद ठेवण्याचे काम केले जात आहे. शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, शिरोळ तालुक्यांतील मोजक्या योजना वगळता अनेक योजनांची चौकशी केली पाहिजे.
- एक ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT