कोल्हापूर

नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणारा वायचळ वर्षभरापासून पसार

CD

नोकरीच्या आमीषाने फसवणूक
करणारा वायचळ वर्षभरापासून पसार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : सरकारी कार्यालये, बॅंकांमध्ये नोकरीच्या आमीषाने २९ लाखांची फसवणूक करणाऱ्या सचिन शरद वायचळ (रा. सनगर गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याचा शोध जुना राजवाडा पोलिस घेत आहेत. बेळगाव येथील कार्यालय बंद करून पसार झालेला वायचळ कोल्हापुरातील घराकडेही वर्षभर फिरकला नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मंगळवार पेठेत त्याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
हिंडलगा (जि. बेळगाव) येथील सेवानिवृत्त शिक्षक सूर्याजी नारायण ओऊळकर (वय ७०) यांनी मुलगा, दोन मुली, जावई यांना कोल्हापुरातील वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात नोकरी लावण्यासाठी वायचळला २९ लाख ८८ हजारांची रक्कम दिली आहे. जुलै २०१६ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत त्याने बॅंक आरटीजीएसद्वारे ही रक्कम स्‍वीकारली आहे. चंदगड तलाठी, कोल्हापूर जिल्हा परिषदेत किंवा नामांकित बॅंकांमध्ये नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याच्याकडून टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे ओऊळकर यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश जुना राजवाडा पोलिसांना दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT