कोल्हापूर

पोलिसवृत्त २

CD

गांजा विक्रेत्याला
दोन दिवस कोठडी
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलेला गांजा विक्रेता अमित शंकर चौगले (वय ३२, रा. लक्षतीर्थ वसाहत) याच्यासह गांजा ओढताना मिळून आलेल्या तिघांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्याला गांजा पुरविणाऱ्याचा शोधही पोलिसांकडून सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.
...
महाविद्यालयांबाहेर
रोडरोमिओंवर कारवाई
कोल्हापूर : शहरातील महाविद्यालये सुरू झाली असून, पोलिसांनीही रोडरोमिओंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी दसरा चौक, शिवाजी पेठ परिसरातील महाविद्यालयांबाहेर निर्भया पथकाने ही कारवाई केली. विनाओळखपत्र महाविद्यालय आवारात फिरणारे, ट्रिपल सीट, भरधाव वाहने चालविण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. याकामी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात येत असून, यापुढे कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे निर्भया पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
स्टेशन रोडवर पोलिसांचा बंदोबस्त
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, रेल्वे स्टेशन, परीख पूल परिसरात वेश्या व्यवसायामुळे होणाऱ्या गर्दीमुळे सर्वसामान्य वाहनधारकही त्रस्त झाले होते. बुधवारी रात्री शिवसेनेच्यावतीने या महिलांना पिटाळून लावण्यात आले. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी व्हिनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर परिसरात थांबणाऱ्या अशा महिलांना हाकलून लावले. तसेच मुख्य चौकांमध्ये रात्री उशिरापर्यंत पोलिस तैनात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT