कोल्हापूर

इचल : आंदोलनाचा इशारा

CD

वीसपर्यंत चौकशी अहवाल
न पाठविल्यास आंदोलन

इचलकरंजी, ता. ५ : इचलकरंजी महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील नियमबाह्य प्रशासनाधिकारी व पर्यवेक्षक नियुक्तीसंदर्भात २० जुलैपर्यंत चौकशी करून अहवाल न पाठविल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ‘आप’चे अभिषेक पाटील यांनी दिला.
इचलकरंजी महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी पदाची जबाबदारी ही शाळांचे नियंत्रण व कार्यभार सुरळीतपणे सुरू ठेवण्याची असते. मात्र, महापालिका आयुक्तांनी एका इचलकरंजी प्राथमिक शाळेतील मुख्याधापकाकडे अतिरिक्त प्रशासनाधिकारी पदाचा कार्यभार सोपविला आहे. अतिरिक्त प्रशासनाधिकारी नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने केली आहे. नियुक्ती करताना सेवाज्येष्ठतेचा विचार न करता स्वतःच्या मर्जीतील कनिष्ठ मुख्याधापकाची नियुक्ती केली आहे. याबाबत कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयास निवेदन देऊन नियमबाह्य प्रशासनाधिकारी व पर्यवेक्षक नियुक्तीच्या चौकशीची मागणी केली होती. निवेदनास चार महिने उलटले तरी देखीलही शिक्षण उपसंचालकांकडून कोणतीही चौकशी वा कारवाई केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाधिकारी व पर्यवेक्षक निवडीसंदर्भात २० जुलै पर्यंत चौकशी करून अहवाल न पाठविल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी संतोष पोवार, कुणाल बागडे, किरण ओव्हळ, अक्षय थोरे, राहुल मिणेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT