कोल्हापूर

इचल : अनोखे आंदोलन

CD

94895
इचलकरंजी : विद्यार्थ्यांची वेशभूषा करून आंदोलन केले. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्र सेवा)
....
शैक्षणिक साहित्य तत्काळ द्या

युवा महाराष्ट्र सेनेचे इचलकरंजीत अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : इचलकरंजी महापालिकेच्या शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तके मिळाली नाहीत. तसेच अभ्यासासाठी आवश्यक वह्या व इतर शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तत्काळ देण्यात यावे, या मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने उपयुक्त स्मूर्ती पाटील यांना देण्यात आले. यावेळी सेनेच्या वतीने फाटक्या गणवेशातील विद्यार्थ्याची वेशभूषा करून महापालिकेसमोर अनोखे आंदोलन केले.
इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनामार्फत व महाराष्ट्र शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या सहकारी शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. असे असताना शाळा सुरू होऊनही शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तके पोहोचवली गेली नाहीत. सरकारी शाळेमधील बेजबाबदारपणे वागणारे प्रशासन, अप्रत्यक्षपणे सगळ्या खासगी शाळांना प्रोत्साहन देत आहे. कारण एकीकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून प्रशासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मात्र, दुसरीकडे त्याच विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य न पोहोचल्यामुळे पालक वर्ग आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करून नाईलाजाने खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत.
या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिकत असतात.त्यांच्या शिक्षणाची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची आहे. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सक्षम होण्याकरिता वेळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आठ दिवसांत शैक्षणिक साहित्य न मिळाल्यास महापालिकेबाहेर विद्यार्थ्यांसह उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात सॅम आठवले, सदाशिव बंडीगणी, रवींद्र कवडे, राजू दंडी, मुद्दासर जमादार, बसवराज टकळगी, सचिन पाटील, हुसेन पटेल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT