कोल्हापूर

विकासकामांना गती

CD

कोट्यवधींचा निधी, पण विकासकामे कुठे?
वेळखाऊ प्रक्रियेने गती संथ ः खोदलेल्या रस्त्यांची स्थिती वाईट

कोल्हापूर, ता. ५ ः गॅस पाईपलाईनची वा पाण्याच्या लाईनची खोदाई झाल्यानंतर पाठोपाठ पॅचवर्क होत नाही. बहुमजली कार पार्किंग, रंकाळा संवर्धन, पादचारी पूल, फुटबॉल स्ट्रीट, हेरिटेज मार्गावरील वीजदिवे अशा कामांची गती संथ आहे. रस्ते प्रकल्पातील गटारींच्या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. कामांबाबत घेतल्या जाणाऱ्या बैठकांत महापालिका प्रशासनाकडून आश्‍वासने दिली जातात. पण, त्यानंतरही फरक पडत नसल्याने विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी, पण कामे कुठे, अशी स्थिती शहरात होत आहे.
खड्डेमय रस्ते, पार्किंगचा पत्ता नसल्याने वाहतुकीची कोंडी, प्राथमिक सुविधांचा अभाव, केवळ नावालाच असलेली उद्याने अशा प्रकारांमुळे शहराच्या विकासाबाबत पर्यटकांकडून वाईट चर्चा होते. त्यामध्ये रस्त्यांवर विविध कामांसाठी खोदाई झाल्यानंतर त्याकडे महापालिकेचे लक्ष आहे की नाही, अशी स्थिती ठिकठिकाणी दिसते. अनेक ठिकाणी पाईपलाईन व गॅसच्या लाईनसाठी खोदाई झाली आहे. पण, त्यावर पॅचवर्क झालेले नाही. खोदाई झाल्यानंतर पॅचवर्क करण्याची जबाबदारी अनेक कामात असते. ती नसेल तर ठेकेदाराकडून पैसे भरून परवानगी दिली जाते. मग त्या ठेकेदाराकडून काम करून घेण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या काय त्रास होतो हे गणित समजत नाही. जर पैसे भरून घेतले असतील तर त्याप्रमाणे तातडीने खोदाई का बुजवून घेतली जात नाही? हाही प्रश्‍न आहे. याकडे होत असलेल्या कानाडोळ्याने बुजवलेल्या कामाच्या ठिकाणी चिखल, तर काही ठिकाणी खोदलेली डांबर-खडी पडलेली आहे. यामुळे आधीच अरूंद रस्त्यावरील जागा कमी झाली आहे. शंभर कोटी निधीतून केल्या जात असलेल्या रस्त्यांच्या कामातील गटारीच्या कामांना मुहूर्त मिळालेला नाही. पाच अर्धवट झालेल्या रस्त्यांवर पावसात गटारी केल्या जाणार असल्याचे गेल्या महिन्यात सांगितले होते. त्याबाबत कुणी विचारणा करते की नाही? हेच समजत नाही.
याबरोबरच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पार्किंग, राज्य शासनाच्या पर्यटन विकास निधीतून सुरू असलेले रंकाळा संवर्धन, हेरिटेज मार्गावरील वीजदिवे, फुटबॉल स्ट्रीट अशा कामांची गती जाणवतच नाही. विविध टप्प्यांवर ती कामे रखडतच सुरू असल्याचे दिसते. काही ठिकाणी अर्धवट पडली आहेत, तर काही ठिकाणी पुढील टप्प्यांच्या कामासाठी रेंगाळली आहेत. जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झालेल्या निधीतून परीख पुलाजवळील पादचारी पुलाचे काम सुरूच झालेले नाही. त्याबाबतच्या आराखड्यात इतका वेळ गेला आहे.
...
काम करायचे की नाही?
रमणमळा येथील तलावाबाबत प्रशासनाला निर्णय घेता आलेला नाही. हेरिटेज यादीत असलेल्या तलावाचे संगोपन महत्त्वाचे असून, त्याऐवजी तो भाड्याने देण्याबाबतचा विचार केला जात आहे. गोकुळ हॉटेलजवळील आधुनिक पार्किंग सुविधेची गाडीही पुढे सरकत नाही. यातून प्रशासनाला काम करायचे नाही किंवा ते होऊ नये म्हणून कोणाचा दबाव असावा, या दोनच शक्यता दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT