कोल्हापूर

महात्मा फुले जनआरोग्य

CD

११९ आजारांच्या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयातच
महात्मा फुले जनआरोग्य योजना ः नवी रचना अंमलबजावणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ५ ः राज्यभरात चालविण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना यांची एकत्रित नवीन अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार योजनेतील ११९ आजारांवरील शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात होणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डाची ऑनलाईन नोंदणी झालेली आवश्यकच आहे. ज्यांचे रेशनकार्ड नाही अशांना तहसीलदारांचे प्रमाणपत्र सादर करूनच योजनेतून लाभ घेता येईल.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत १ हजार ३५६ आजारांवर मोफत उपचार होतात. त्यापैकी ११९ आजार शासकीय रुग्णालयातच करून घ्यावे लागणार आहेत. यात हार्निया, अपेंडीससारख्या नियमित आजारातील शस्त्रक्रियांचा समावेश झाला आहे. याशिवाय रस्ते अपघातग्रस्त रुग्णास प्रतिवर्षी १ लाख पर्यंत मोफत उपचार मिळतील. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर ४.५ लाख पर्यंत उपचार होतील. जिल्ह्यात एकूण ६५ रुग्णालयांत योजना आहे. त्यापैकी ५६ खासगी व ९ शासकीय रुग्णालये आहेत. येथे नवीन अंमलबजावणी अंगीकृत रुग्णालयातून व्हावी, अशा सूचना जनआरोग्य राज्य समितीकडून दिल्या आहेत. नवीन अंमलबजावणीनुसार रुग्णालयाने उपचार देण्याबाबत दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास रुग्णालयावर कारवाई होईल, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

....यांना घेता येतो योजनेचा लाभ
लाभार्थी महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारक व आयुष्यमान भारत कार्ड धारक., रेशन कार्ड नसलेली - अधिवासी धारक अथवा तहसीलदार प्रमाणपत्र, शासन मान्य संस्थेतील अनाथ मुले, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा लगत ८६५ गावातील कुटुंब, रस्ता अपघातग्रस्त महाराष्ट्रा बाहेरील वा देशाबाहेरील

लाभार्थींसाठी आवश्‍यक कागदपत्रे :
महाराष्ट्रातील कोणतेही रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड
ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
रेशनकार्ड नसल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र
रस्ते अपघात ग्रस्तांसाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे त्या जिल्ह्यातील एमएलसी, ओळखपत्र
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील रेशनकार्ड, ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT