कोल्हापूर

जोतिबा संवर्धन

CD

03200
----------
जोतिबा देवाच्या मूर्तीची
संर्वधन प्रक्रिया उद्यापासून
मूळ मूर्तीचे दर्शन पाच दिवस बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. ५ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मूर्तीची संर्वधन प्रक्रिया रविवार (ता. ७) पासून पाच दिवस होणार आहे. या काळात मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन व कळस दर्शन घेता येणार आहे. संर्वधन प्रक्रिया काळात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समिती, पुजारी, गावकरी यांनी केले आहे.

जोतिबा देवाची मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासकांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्त्‍व विभागाला वारंवार कळविले होते. मूर्तीची संर्वधन प्रक्रिया करण्याबाबत पुरातत्त्‍व विभाग (पुणे) चे सहायक संचालक यांनी अहवाल दिला होता. त्यानुसार देवस्थान व्यवस्थापन समितीने ४ एप्रिल २०२४ ला पुरातत्त्‍व विभागाला संर्वधन प्रक्रिया करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार पुरातत्त्‍व विभागातर्फे मूर्ती संर्वधन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे.

पुरातत्त्‍व विभागातर्फे जोतिबा मूर्तीची संर्वधन प्रक्रिया रविवारपासून पाच दिवस होत आहे. त्यामुळे भाविकांनी या काळात प्रशासनास सहकार्य करावे.
- धैर्यशील तिवले, अधीक्षक, देवस्थान समिती कार्यालय जोतिबा डोंगर

- संवर्धन कशासाठी?
मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी, या उद्देशाने होणार संवर्धन प्रक्रिया
- संवर्धन प्रक्रिया कशी?
प्रत्यक्ष संवर्धन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुठे काही भागाची झालेली झीज लक्षात येईल. त्यानुसार मग संवर्धनाची प्रक्रिया होईल.
- प्रक्रिया किती दिवस?
सलग पाच दिवस म्हणजेच सात जुलै ते अकरा जुलै या कालावधीत संवर्धनाची प्रक्रिया होणार आहे.
------------------------०००००००००----------------
फोटो ओळी
जोतिबा देवाची महापूजा व मंदिर परिसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

Mumbai Sipahi Recruitment: शिपायाच्या ८८७ जागांसाठी २ लाख १४ हजार अर्ज; मुंबई उच्च न्यायालयातील भरतीमधील धक्कादायक स्थिती, बेरोजगारीचे वास्तव!

Niphad News : 'केस कापायला नेतो' सांगून घराबाहेर पडले, अन काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली; निफाडमधील हृदयद्रावक घटना

Farsawale Baba: कोण होते 'फरसा वाले बाबा'? त्यांच्या ४०० गायींचं काय होणार? योगी सरकारने घेतला मोठा निर्णय, दोषींवर कारवाई

SCROLL FOR NEXT