कोल्हापूर

प्रा. पाटील लेख

CD

फोटो - 95082
-----------
एन्ट्रो

प्रा. डॉ. सुजय बाबूराव पाटील,
कोल्हापूर
००००००००००
एन्र्टो
आपल्या ग्रंथ कर्तृत्वाद्वारे दत्त संप्रदायाचा विस्तार करणारे व मराठी संत साहित्यात मोलाची भर घालणारे टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती यांचे वाङ्‌मयीन कर्तृत्व लक्षणीय असे आहे. या ग्रंथ निर्मितीमागे मराठी भाषेचा विस्तार, प्रसार आणि जतन हा हेतू दिसून येतो, तसाच समाजोद्धार ही तळमळदेखील दिसून येते. त्यांची आज (ता. ६) ११० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त...

संत साहित्यात टेंबे स्वामींचे मोलाचे योगदान
टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती यांनी तीर्थक्षेत्राचे महत्त्व समजून घेण्यासाठी, तसेच दत्तगुरूंच्या स्थानांची महती जाणून घेण्यासाठी २४ वर्षे भारतभ्रमंती केली. याप्रसंगी आपल्या भक्तांना त्यांनी अनेक पत्रेदेखील लिहिली. त्यामधून केलेले उपदेश व्यावहारिक व आध्यात्मिक पातळीवर महत्त्वपूर्ण, मार्मिक आहेत. यामधून स्वामी ज्योतिषशास्त्र, योगशास्त्र, मूर्तिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगोलशास्त्र, वनौषधी व आयुर्वेदशास्त्र यांचे जाणकार म्हणून आपल्याला भेटतात. स्वामींचा साधकावस्थेतून सिद्धावस्थेकडे झालेला प्रवास कसा होता, याचाही शोध या पत्रांआधारे घेता येतो.
त्यांनी असंख्य भक्तांना वेळोवेळी लिहिलेली पत्रे म्हणजे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने इतरांची आस्थेवाईकपणे चौकशी करावी, अशा संवादी स्वरूपाची आहेत. ‘दत्तमाहात्म्य’, ‘दत्तचंपू'', ''कृष्णलहरी'' आदी ग्रंथ आपल्याला भ्रमणाच्या काळात कसे सुचले, काव्यनिर्मिती कशी झाली, या संदर्भातील माहिती या पत्रांतून आहे. एक कवी म्हणून टेंबे स्वामींसारखी व्यक्ती आपल्या काव्यग्रंथांकडे कशी पाहते, हेही दिसून येते. भारतभ्रमंतीमधील तपसाधनेतील अनेक अनुभव इथे व्यक्त होतात, तसेच पर्जन्यकाळ, प्लेगच्या साथीचा काळ, महागाई, दुष्काळी स्थिती यांसारख्या घटनांचे आपल्या पत्रांमधून केलेले भाष्य टेंबे स्वामींचे समाजजीवनाचे निरीक्षण किती सूक्ष्म होते, याची साक्ष आपणास पटते.
''विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।
अवघेची जाले देह ब्रह्म ।।''
ज्ञानदेवांप्रमाणेच टेंबे स्वामींची आपल्या भक्तांविषयी असणारी भावना या पत्रांच्या निमित्ताने व्यक्त होताना दिसते.
स्वामींनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करून दत्तसंप्रदायाचा विस्तार केला. संस्कृत समश्लोकी गुरुचरित्र, द्विसहस्त्री गुरुचरित्र, योगरहस्य, बोधरहस्य, दत्तपुराण, गुरुसंहिता, दत्त लीलामृत सार, दत्त भाव स्तोत्र आदी ग्रंथांची निर्मिती करून दत्तसंप्रदायाचा प्रसार व भक्तांना सन्मार्ग दाखविणे, हा उद्देश सफल केला, असे म्हणता येईल. कवी आणि तत्त्वज्ञ म्हणून टेंबे स्वामींचे एक वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व इथे आपणास अभ्यासावयास मिळते. महाराष्ट्रातील लोकांसाठी मराठी भाषेतून, तर महाराष्ट्राबाहेरील लोकांसाठी त्यांनी संस्कृत भाषेतून ग्रंथनिर्मिती केली. या ग्रंथांच्या परिशीलनातून आबालवृध्दांसह साधू, तपस्वी, योगी या सर्वांना मार्गदर्शन मिळते तसेच सर्व समाजाचे मानसिक, बौद्धिक व आचरणविषयक आरोग्य समृद्ध होईल, असा विश्वास वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : नऊ दिवस बंद ठेवलेला करूळ घाटमार्ग आज दहाव्या दिवशी वाहतुकीस खुला

Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT