कोल्हापूर

अधिवेशनातून- सतेज पाटील

CD

नद्यांमधील गाळ काढण्यासाठी
शासनाने कोणती कार्यवाही केली?

सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : जिल्ह्यात उद्‍भवणाऱ्या पूरस्थितीसंदर्भात तसेच पंचगंगा नदी आणि इतर नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असल्याची माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या असून, जिल्ह्यातील पूरस्थितीला जबाबदार असलेल्या नद्यांमधील गाळ मागील दहा ते बारा वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे पंचगंगा नदीत आणि इतर नद्यांमध्ये सुमारे साडेपाच लाख घनमीटर गाळ साचल्याने तिथे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झाला असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

‘वीज कंत्राटींना सरसकट
हरियाणा पॅटर्न लागू करा’
राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये वीस वर्षांपासून काम करणाऱ्या ४२ हजार कंत्राटी कामगारांसाठी सरसकट ''हरियाणा पॅटर्न'' लागू करावा, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. त्यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व युनियनसोबत ऊर्जा सचिवांची बैठक होत असून, तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती सभागृहात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

Latest Marathi News Update: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित

Suryakumar Reaction: कॅप्टन्सी पण गेली अन् संघातूनही काढलं, नव्या कर्णधारासह टीम जाहीर होताच काय म्हणाला सूर्या?

SCROLL FOR NEXT