कोल्हापूर

‘गोकुळ’ निनावी पत्राच्या आधारे गुन्हे दाखल करावेत : शौमिका महाडिक

CD

‘गोकुळ’ला आलेल्या निनावी पत्राच्या
आधारे गुन्हे दाखल कराःशौमिका महाडिक

बदनामी नको म्हणून कारवाई मीच थांबवली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ गोकुळच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यानुसार गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त झाले असते. मात्र, ही कारवाई वैयक्तिक आकसापोटी करून गोकुळची बदनामी केली असे चर्चा झाली असती. त्यामुळे ही कारवाई मीच थांबवली आहे. तसेच गोकुळकडे आलेल्या निनावी पत्रातील औषध घोटाळ्याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आज येथे केली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाकडे काल औषध घोटाळ्याबाबत निनावी पत्र आले आहे. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
महाडिक म्हणाल्या, ‘गोकुळ’मध्ये चुकीचा कारभार होत आहे. याबद्दल अनेकवेळा आवाज उठवला होता. याची चौकशीही झाली. न्यायालयाने या कारभाराबाबत ताशेरी ओढले आहेत. मात्र, सत्ताधारी संचालकांना काही दिवस संधी द्यावी, या हेतूने ही कारवाई आपण स्वतःच थांबवली आहे. मात्र, अजूनही हा कारभार थांबलेला नाही. ‘गोकुळ’मध्ये डॉक्टरांकडून गैरव्यवहार केला जात असल्याचे निनावीपत्र आले आहे. या पत्राला बेदखल करण्याऐवजी त्याची चौकशी करून फौजदारी दाखल करावी, हे पत्र खोडसाळपणे लिहिले आहे असं म्हणणं चुकीचं आहे.

चौकट
...म्हणून निनावी पत्राद्वारे दिली माहिती
प्रस्थापितांना अंगावर घेणे परवडणार नाही म्हणूनच संबंधिताने औषध खरेदी घोटाळ्याची माहिती निनावी पत्राद्वारे दिली आहे. याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

Pargaon POCSO Case: पारगावमध्ये अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग; दोन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा, अटक

Anna Bhau Sathe Memorial : अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दादाभाऊ लोखंडे यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही कायम; विविध संघटनांचा पाठिंबा

Crime News: जेलमधून पळून आलेल्या ‘इक्का’कडून प्रेयसीला इन्स्टाग्रामवर अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या; बेलतरोडी पोलिसांत गुन्हा

Pune Traffic Diversion: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त स्वारगेट–सारसबाग परिसरात शनिवारी वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग व पार्किंगची नवी व्यवस्था

SCROLL FOR NEXT