कोल्हापूर

पाऊस बातमी

CD

(फोटो 95246, 95245

शहरासह जिल्ह्यात संततधार
तरण्याचे जोरदार आगमन; पंचगंगेच्या पातळीत एक फुटाची वाढ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ज्येष्ठ महिन्यातील नवे नक्षत्र शुक्रवारी (ता.५) बदलले. हत्ती वाहन असलेल्या तरणा नक्षत्राला सुरुवात झाली. तरण्याचे आगमनच जोरदार झाले. धरण क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्रच आज पाऊस दमदार बरसला. शहरातही संततधार सुरू होती. त्यामुळे दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक फुटाची वाढ झाली. धरणातील पाणीसाठा वाढत असून, जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात जूनमध्ये लांबलेला पाऊस जुलैच्या सुरुवातीपासूनत बरसू लागला. मात्र, धरणक्षेत्र वगळता पावसाने जोर धरलेला नव्हता. आज नक्षत्र बदलल्याने पावसाला पुन्हा दमदार सुरुवात झाली. शहरात पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला. त्यानंतर तासाभराची उसंतही न घेता पाऊस पडत होता. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. दुपारी ४ वाजता राजाराम बंधारा येथे नदीची पाणी पातळी २५ फूट ७ इंच इतकी होती. रात्री ८ वाजता नदीची पाणी पातळी २६ फूट ३ इंच इतकी झाली होती. सध्या राधानगरी धरणात ३.३५ टीएमसी पाणीसाठा असून, धरण ४०.२ टक्के भरले आहे. दूधगंगा धरणात ७.२८ टीएमसी पाणीसाठा असून, धरण २८.६७ टक्के भरलेले आहे.

चौकट
पाण्याखाली असणारे बंधारे
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, चिंचोली, हळदी, राशिवडे, कोगे, यवलूज, पुनाळ, ठाणे आवळे, वालोली, पिळणी, बिजूर-भोगोल, हिंडगाव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, अडकूर, तारेवाडी, साळगाव, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकरे, माणगाव, दत्तवाड.

चौकट
राधानगरी, काळम्मावाडी धरण क्षेत्रात अतिवृष्टी
राधानगरी ः राधानगरीसह काळम्मावाडी धरण क्षेत्रात सलग पाचव्या दिवशीही अतिवृष्टी झाली. चोवीस तासांत राधानगरी धरण क्षेत्रात ९६, तर काळम्मावाडीत ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीने काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल चार टीएमसीने वाढ झाली आहे. पावसाळ्यापूर्वी धरणात तीन टीएमसी पाणीसाठा होता. सध्या धरणात सात टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गात ५० क्युसेकने वाढ केली आहे. आता धरणातून वीजनिर्मितीसाठी १२५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील दाजीपुरात ७२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर दुपटीने पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT