कोल्हापूर

बटाट्याची उसळी; कोंथिबिरीची घसरण

CD

gad74.jpg
95484
गडहिंग्लज : फळबाजारात कर्नाटकातील पेरूची आवक सुरू झाली आहे. (आशपाक किल्लेदार: सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------------------
बटाट्याची उसळी; कोंथिबिरीची घसरण
मुळ्याची आवक : वांगी, टोमॅटो वधारले: तोतापुरी अधिक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : पावसामुळे आवक घटल्याने बटाट्याच्या दराने उसळी घेतली आहे. वांगी, टोमॅटोचे भाव वधारले आहेत. बिन्स, गवारीचा दर तेजीत आहे. भाजी मंडईत मुळ्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे कमी झालेले दर कायम आहेत. फळबाजारात बंगळूर परिसरातून येणाऱ्या तोतापुरीची वाढलेली आवक टिकून आहे.
महिनाभर स्‍थिर असणाऱ्या बटाट्याचे दर कमी आवकेने उसळले आहेत. क्विंवटलमागे ३०० रुपयांनी दर वाढल्याने किरकोळ बाजारातही ५ ते १० रुपयांनी किलोला दर वाढले आहेत. क्विंवटलचा ३००० ते ३८०० रुपये असा दर झाला आहे. किरकोळ बाजारात ३५ ते ५० रुपये विक्री सुरू होती. लसू‍ण दरातही वाढ असून १५००० ते २५००० रुपये क्विंटल तर १८० ते ३२० रुपये किलो असा दर होता. तुलनेत कांदा स्थिर असून २२ ते ४० रुपये किलो असा दर असल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. आले शिमोगा २०० रुपये किलो आहे.
भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक अधिक तर फळभाज्यांची कमी आहे. टोमॅटो, वांगी यांच्या दरात दहा किलोमागे १०० रुपयांनी वाढ आहे. कारली, दोडका, वांगी, ढब्बू, टोमॅटो यांचा घाऊक बाजारात दहा किलोचा दर ५०० रुपये होता. बिन्सचा तोरा कायम असून किलोला सेंच्युरीचा दर कायम आहे. मेथी, लाल भाजी, कांदा पात, पालक १० रुपये पेंढी असा दर होता. हिरव्या मिरचीचा दर दोन महिन्यांनंतर किलोला २० रुपयांनी उतरून ६० वर आला. त्यामुळे खर्ड्याचा ठसका कमी होणार आहे. फळभाजारात केळीचे दर चढेच आहेत. वसई ४० ते ५० तर जवारी ७० ते ८० रुपये डझन दर आहे. सफरचंद, डाळिंब, मोसंबी १४० ते २०० रुपये किलो आहेत. तोतापुरी, अननस नगाला २० ते ३० रुपये दर आहे. स्थानिक यात्रांमुळे जवारी कोंबड्यांना मागणी आहे. कचेरी रोडवरील बाजारात ४०० ते १२०० रुपयापर्यंत आकारानुसार कोंबड्याचे दर होते.
--------------
पेरूची नवी आवक
फळबाजारात देशी पेरूची नवी आवक सुरू झाली आहे. थायलंड म्हणून ओळखली जाणारी मोठ्या पेरूची आवक वर्षभर कायम होती. तुलनेत आकाराने लहान असणारे हे देशी पेरू चवीला गोड असल्याने मागणी होती. लगतच्या कर्नाटक, शिरोळ तालुक्यातून ही आवक होते. किलोला ६० रुपये असा दर होता.
------------
* बाजार दृष्‍टिक्षेपात
- पालेभाज्या भरपूर
- हिरवी मिरची उतरली
- फळांची आवक कमी
- कोंबड्यांना मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT