कोल्हापूर

पालेभाज्या स्वस्त, गवार, दोडका, वांगे तेजीत

CD

पालेभाज्या स्वस्त, गवारी, दोडका, वांगी तेजीत
टोमॅटो चाळिशीत ः लिंबू उतरला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता, ७ : पालेभाज्या उत्पादनासाठी अपेक्षित पाऊस पडू लागल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, शेपू, पोकळा, कांदापात आदी भाज्यांचे दर अगदी दहा रुपये पेंडी असे खाली आले आहेत. गवारी, वांगी, दोडका अजूनही तेजीत आहे. मागील आठवड्यात पन्नास रुपये किलोवर गेलेला टोमॅटो आज ४० रुपये किलोप्रमाणे विकला जात होता. विशेषतः चिकोडी, संकेश्वर, मिरज आदी भागांतून पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. बटाटा चाळीस, तर कांद्याची पस्तीस रुपये किलो अशा दराने विक्री होत आहे.
----------
पालेभाज्यांचे दर
मेथी*१० रुपये, कोथिंबीर*५ रु. पेंडी, कांदापात *१० रु., पोकळा* ७ रु., लालमाठ* १० रु., तांदळी * १० रु., अळू - १० रु., पालक *१० रु., मिश्र भाजी - * १० रु. वाटा, पुदिना - *१० रु. पेंडी.
---------
फळभाज्यांचे दर
कोबी - * १५ ते २५ रु., फ्लॉवर -* १५ ते ३० रु. नग, ढब्बू मिरची - * ६० रु. किलो, ओली मिरची- *८० ते ९० रु. किलो, दोडका - *१०० रु., वांगी- *१०० रु. किलो, बीट- *१० रु. नग, भेंडी- * ६० रु., कारली- *४० रु., पडवळ- *८० रु. किलो, स्वीट कॉर्न - * १० रु. नग,
-------------
फळ बाजार दर
सफरचंद- * २०० ते ३०० रु. किलो, डाळिंब- *१०० ते १२० रु., केळी (जवारी) *४० ते ७० रु., केळी - *३० ते ६० रु.. तोतापुरी- * १०० रु. तीन नग, पेरू-* ८० ते १२० रु. किलो, अननस- * २० ते ५० रु. नग, ड्रॅगन फ्रूट - *१२० रु. किलो, कच्चे खजूर - १०० रु. किलो.
----------
कोथिंबीर पेंडी ६५ वरून पाच रुपयांवर
गेले दोन महिने कोथिंबीर पेंडीचा दर कधी पासष्ट, तर कधी सत्तर रुपये असा होता. त्यामुळे सर्वसामान्यांनी कोथिंबीर खरेदीकडे पाठ फिरवली होती. अनेकांनी जेवणातूनच तिला हद्दपार केले होते. आता हीच कोथिंबीर पाच रुपये पेंडी अशी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाली. विशेषतः चिकोडी, मिरज, बेळगाव आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर पडले आहेत. घाऊक बाजारात पन्नास पैसे ते दीड रुपया प्रति पेंडी असा दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या शेतात नांगर फिरवल्याची दृश्‍ये समाजमाध्यमातून प्रसारित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT