कोल्हापूर

आजरा ः पोलीस वृत्त

CD

गणेशवाडीत मारामारीप्रकरणी
अकरा जणांवर गुन्हा दाखल

आजरा, ता. ७ ः कासारकांडगाव पैकी गणेशवाडी (ता. आजरा) येथे जमीन कसण्याच्या वादातून झालेल्या मारामारीमध्ये नऊजण जखमी झाले. याबाबत आजरा पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बांबर नावाच्या शेतामध्ये काल सकाळी तरवा काढण्याचे काम चाळके कुटुंबीयांकडून सुरू होते. ही जमीन कसण्यावरून वाद असल्याने तेथे संजय मनगूतकर व काहीजण आले. तरवा काढण्यावरून वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये शोभा संजय चाळके, संजय शंकर चाळके, चंद्रकांत कृष्णा चाळके, वसंत जयराम चाळके, आप्पा कृष्णा चाळके, सुमन महेश चाळके, संजय भाऊ मनगुतकर, सीताराम नारायण पारपोलकर, दत्ता नारायण पारपोलकर हे नऊजण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय मनगुतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संजय चाळके, चंद्रकांत चाळके, वसंत चाळके, आप्पा चाळके, शोभा चाळके व सुमन चाळके यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. शोभा संजय चाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय भाऊ मनगुतकर, सीताराम नारायण पारपोलकर, दत्तात्रय नारायण पारपोलकर, उमेश चिमाजी डेळेकर व मसू तुकाराम डेळेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT