कोल्हापूर

मी जवाहरनगरचा राजा, तुमची वर्दीच उतरवतो

CD

‘मी जवाहरनगरचा भाई, तुमची वर्दीच उतरवतो’
बिंदू चौक सबजेलमध्ये बंद्याची पोलिसाला धमकी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः बिंदू चौक सबजेलमधील बंद्याची माहिती घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला दमदाटीचा प्रकार घडला. ‘तुम्हाला कशाला पाहिजे माहिती, बाहेर भेटा तुम्हाला बघून घेतो. मी जवाहरनगरचा भाई आहे, तुमची वर्दीच उतरवतो,’ असा दम देणाऱ्या साजीद ऊर्फ फिरोज अल्लाबक्ष शेख (रा. जवाहरनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
बिंदू चौक सबजेलमधील पोलिस शिपाई इजाज अब्दुल रहीम शेख व सुभेदार रवींद्र पाटील हे आज सकाळी सबजेलमधील दवाखान्यात बंद्यांची माहिती घेत होते. दाखल कैद्यांना असणारे आजार, त्यांची शारीरिक मोजमापे घेण्याचे काम सुरू असताना न्यायाधीन बंदी साजिद ऊर्फ फिरोज शेख याने पोलिसांना माहिती दिली नाही. पोलिसांना शिवागाळ करत, ‘तुम्हाला कशाला पाहिजे माहिती? तुम्ही बाहेर भेटा, तुम्हाला बघून घेतो. मी जवाहरनगरचा भाई आहे. तुमची वर्दी उतरवतो,’ अशी धमकी दिली. पोलिसांना असहकार्य करीत स्वतःचे काहीतरी बरे-वाईट करून घेण्याची भीतीही तो पोलिसांना घालत होता. याबाबत पोलिसांनी त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद देत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT