कोल्हापूर

‘सिंचन’ पेक्षा ‘बिगर सिंचन’ची वसुली जोमात

CD

डाटा रिसर्चः लोगो
प्रवीण देसाई
...
पाणीपट्टी वसुलीत ‘सिंचन’ मागे

चार वर्षांतील चित्र ः ‘बिगर सिंचन’ पुढे

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाकडून वसूल केल्या जाणाऱ्या पाणीपट्टीमध्ये सिंचन विभागाच्या तुलनेत बिगर सिंचन विभाग पुढे असल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षांतील चित्र पाहता यावर्षी दोन्ही विभागांची वसुली चांगली झाली आहे. असे असले तरी यामध्येही बिगर सिंचनचीच वसुली चांगली झाल्याचे दिसत आहे. तर ‘सिंचन’ची वसुली मागे असण्यामध्ये पाणीपट्टी दरवाढ व साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिले न देणे, ही प्रमुख कारणे समोर आली आहेत.
...
‘उत्तर'' विभागाची चार वर्षांतील वसुली
सन * सिंचन वसुली * बिगर सिंचन वसुली
२०२०-२१ *४ कोटी ९४ लाख * २१ कोटी ३ लाख
२०२१-२२ * ७ कोटी ४२ लाख * २३ कोटी ५२ लाख
२०२२-२३ * ७ कोटी ९९ लाख * ४० कोटी ८२ लाख
२०२३-२४ * ७ कोटी ६९ लाख * ४६ कोटी ३२ लाख
...
‘दक्षिण’ विभागाची चार वर्षांतील वसुली
सन * सिंचन वसुली * बिगर सिंचन वसुली
२०२०-२१ * ३ कोटी ४४ लाख * ३ कोटी ५२ लाख
२०२१-२२ * ३ कोटी ८१लाख * २ कोटी ७४ लाख
२०२२-२३ * ४ कोटी १३ लाख * ३ कोटी २३ लाख
२०२३-२४ * ४ कोटी ३ लाख * ३ कोटी ७१ लाख
...
उत्तर विभागाचे कार्यक्षेत्र व ग्राहक
पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यक्षेत्र भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, आजरा हे आहे, तर दक्षिण विभागात करवीर, राधानगरी, कागल, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा हे तालुके येतात. येथील ग्राहक हे औद्योगिक असून यामध्ये महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, साखर कारखाने, एमआयडीसीतील मिल व कारखाने आदींचा समावेश आहे.
...
‘दक्षिण'' विभागाचे कार्यक्षेत्र व ग्राहक
पाटबंधारे दक्षिण विभागाच्या कार्यक्षेत्रात भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड हे तालुके येतात. येथील ग्राहक हे शेतकरी व ग्रामीण पाणीपुरवठा संस्था आहेत.
...
‘शासनाकडून दरवर्षी सिंचन व बिगर सिंचन विभागातील पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पाटबंधारे विभागाला देण्यात येते. यामध्ये दोन्ही विभागांची वसुली चांगल्या पद्धतीने करण्याचा पाटबंधारे विभागाचा प्रयत्न असतो.
-स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT