कोल्हापूर

जिल्ह्यातील दहा उपनिबंधक कार्यालयांना जागा मंजूर : अपर जिल्हाधिकारी

CD

95757
...................................
जिल्ह्यातील दहा उपनिबंधक
कार्यालयांना जागा मंजूर

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ‘जिल्ह्यात १८ उपनिबंधक कार्यालये आहेत. त्यापैकी १० कार्यालयांना जागा मंजूर केली आहे, तर शहरातील जिल्हा निबंधक कार्यालय व चार उपनिबंधक कार्यालयांसाठी १५ गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर कार्यालय बांधण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे,’ असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज येथे केले.
सह दुय्यम निबंधक वर्ग-२ करवीर, कोल्हापूर या कार्यालयाच्या नूतनीकरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह जिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत प्रमुख उपस्थित होते. कार्यालयाचा नूतनीकरण प्रारंभ अपर जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
अपर जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, ‘दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, कार्यालयाच्या सुशोभिकरणामुळे दस्त नोंदणीचे कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होईल.’
सह जिल्हा निबंधक वाघमोडे म्हणाले, ‘नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. या योजनेमध्ये जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२, करवीर क्र. २ कोल्हापूर या कार्यालयाची निवड करण्यात येऊन कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी १० लाखांचा निधी स्वीय प्रपंजी लेख्यातून मंजूर केला आहे. त्यातून कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होतील. अशा पद्धतीने कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे.’
यावेळी दुय्यम निबंधक तानाजी नाईक यांच्यासह नोंदणी विभागातील कर्मचारी व कोल्हापूर बार असोसिएशनचे विधिज्ञ, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT