कोल्हापूर

भाजप निवेदन बातमी

CD

फोटो 95782

आयुष्‍मान भारत योजनेसाठीची
नागरिकांची अडवणूक थांबवा

भाजपचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ आयुष्‍मान योजना आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही मिळणार आहे. मात्र, यासाठी रेशनकार्डधारकांना १२ अंकी नंबर देण्यात येणार आहे. सध्या हा नंबर देण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत असून, नागरिकांची अडवणूक केली जाते. ही अडवणूक थांबावी आणि नागरिकांना त्वरित १२ अंकी नंबर मिळावा, अशी मागणी भाजपने केली. याबाबतचे निवेदन आज जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, आयुष्‍मान भारत योजनेमध्ये आता पांढरे रेशनकार्डधारकांचाही समावेश केला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार १०३ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी पोर्टल आणि महा-ई-सेवा केंद्रात अर्ज करूनही दोन महिने हा बारा अंकी क्रमांक मिळत नाही. नागरिकांची अडवणूक केली जाते. ही अडवणूक थांबवून कमीत कमी कालावधीत १२ अंकी नंबर मिळावा.
शहर पुरवठा अधिकारी नितीन धापसे-पाटील उपस्थित होते. जिल्हा पुरवठा कार्यालयातील कामासंबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, रोहित पवार यांनी सदर विभागातील अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करून त्यांच्याकडील कामे त्वरित निकाली काढावीत, असे सांगितले.
डॉ. सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, शैलेश पाटील, विराज चिखलीकर, विजयसिंग खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, आशिष कपडेकर, रोहित पोवार, रमेश दिवेकर, संगीता खाडे, अभिजित शिंदे, महेश यादव, प्रग्नेश हमलाई, डॉ. शिवानंद पाटील, रविकिरण गवळी, कोमल देसाई, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT