कोल्हापूर

इचल : मुंबई बैठक

CD

ich87.jpg 95822
मुंबई ः वस्त्रोद्योग तज्‍ज्ञ समितीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उपस्थित मंत्री दादा भुसे, आमदार प्रकाश आवाडे आदी.

वस्त्रोद्योगातील प्रलंबित
प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा

मुंबई तज्‍ज्ञ समितीची बैठक
इचलकरंजी, ता. ८ ः राज्यातील वस्त्रोद्योगातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात सोमवारी मुंबईत समितीची बैठक झाली. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती समिती सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या तज्‍ज्ञ समिती नेमण्यात आली आहे. या समितीने सर्व बाबींचा विचार करून उपाययोजना संदर्भात अहवाल तयार केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्या विषयावर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज रात्री प्रदीर्घ काळ बैठक झाली.
यामध्ये मल्टीपार्टी कनेक्शन, वीज सवलत, व्याज सवलत, वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करणे यासह प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांची लवकरच घोषणा केली जाणार आहे. बैठकीस अभ्यास समितीचे अध्यक्ष दादा भुसे, आमदार आवाडे, रईस शेख, सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग, उपसचिव श्रीकृष्ण पवार, महावितरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT