कोल्हापूर

पोलिस वृत्त एकत्रित

CD

सोन्याचे दागिणे
असलेली पर्सची
एसटीतून चोरी

कोल्हापूर ः एस.टी. बस मधील प्रवाशाची सोन्याचे दागिणे असलेली बॅग चोरट्याने पळविली. अर्धा तोळे सोन्याचे मंगळसूत्र, दीड ग्रॅमच्या रिंगा, पैंजण आणि रोख साडेतीन हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. सुरेखा गिरीष मोहिते (रा. जरग गल्ली, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता.५) सायंकाळी सव्वापाच ते पावणेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. निपाणी ते कोल्हापूर एसटी बसमध्ये गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा ते उमा टॉकीज चौक दरम्यानही चोरी झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
........................
उपचारादरम्यान
वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर ः तणनाशक पिलेल्या वृद्धेचा आज सीपीआरमध्ये मृत्यू झाला. नानूबाई केशव सुर्वे (वय ८१ चाफोडी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. वृद्धेने १ जुलैला राहत्या घरी तणनाशक पिले होते. त्यानंतर नातेवाईकांना त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली.
--------
डॉक्टर महिला
पाय घसरून जखमी

कोल्हापूर ः रंकाळा परिसरातील जाऊळाचा गणपती मंदिराजवळ केएमटी बसमध्ये चढताना पाय घसरून डॉक्टर महिला जखमी झाली. डॉ. विशाखा वीरभद्र घोडके (वय २८, रा. लातूर) असे त्यांचे नाव आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी डॉ. घोडके यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले. त्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT