कोल्हापूर

खाजगी शाळांतील शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करा

CD

95913
.......
खासगी शाळांतील शिक्षकांना
आश्वासित प्रगती योजना लागू करा

राज्याध्यक्ष भरत रसाळे : शिक्षण उपसंचालकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : शालेय शिक्षण विभागाच्या १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगात प्रस्तावित केलेली दहा, वीस आणि तीस वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. तथापि, मान्यताप्राप्त शाळांमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या लाखो मुख्याध्यापक, शिक्षकांना ही योजना अद्यापही लागू केलेली नाही. त्यांना ही आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी आज शिक्षणमंत्री, शिक्षण सचिवांकडे केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे दिले.
निवेदनात म्हटले आहे, सातव्या वेतन आयोगातील बक्षी समितीच्या खंड दोनमधील शिफारशीनुसार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा, वीस आणि तीस वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना १४ मार्च २०२४ च्या शासन आदेशाने लागू केली आहे. पण, मोठ्या संख्येने असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांना ही आश्वासित प्रगती योजना अद्यापही लागू केलेली नाही. शासनाकडून फक्त आश्वासन दिले जात आहे. ही बाब या घटकांवर अन्याय करणारी आहे. म्हणून या अधिवेशनामध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या निर्णय जाहीर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT