कोल्हापूर

लाडक्या बहिणीचे अर्ज तिसऱ्यांदा बदल

CD

95994
...
‘लाडक्या बहिणी’चे अर्ज तिसऱ्यांदा बदलले
महिलांना विनाकारण मनस्ताप ः पहिला दिला दुसऱ्याची मागणी, दुसरा दिला तर तिसऱ्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना खूश करण्यासाठी राज्य शासनाने गडबडीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचीही झुंबड उडाली. मात्र ‘लाभ नको, अपडेट आवरा’, अशी साद आता लाडक्या बहिणींकडून होऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे योजना सुरू केल्यापासून हा अर्ज तिसऱ्यांदा बदलला आहे. बदललेल्या अर्जाची कल्पना नसताना महिला जुना अर्ज घेऊन गेल्यानंतर त्यांना पुन्हा नवा अर्ज आणण्यास सांगितले जाते. यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे.
योजनेची घोषणा झाल्यानंतर सुरूवातीला अर्जावर फक्त काही प्रश्न व हमीपत्र एवढेच होते. त्यामध्ये दोन दिवसांपुर्वी बदल करत अर्जाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावण्यात आले. तर स्वाक्षरीच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची छायाचित्रे अपडेट करण्यात आली. यामध्ये पुन्हा बदल करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवून तेथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्र्याचे छायाचित्र अपडेट करण्यात आले आहे.
हे अर्ज भरून अंगणवाडी सेविका, महा ई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीमध्ये द्यायचे आहेत. योजनेत सुलभता यावी, यासाठी कागदपत्रांचा ससेमिरा कमी केला असला तरी अर्ज बदलल्यामुळे महिलांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पहिला अर्ज महिलांनी प्रिंट काढून नेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर अपडेट केलेला दुसरा अर्ज पाठविण्यात आला. हा अर्ज प्रिंट करून आणा, असे सांगितले. ग्रामीण भागात तसेच अंगणवाडीच्या शेजारी झेरोक्स, प्रिटिंगची सुविधा नसल्याने लांबून नवा अर्ज प्रिंट काढून नेल्यानंतर आता पुन्हा तिसरा अर्ज आणा, असे सांगितल्यानंतर महिलांकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
...

‘सर्व्हर डाउन’चाही मनस्ताप
अर्जासोबतच नारीशक्ती दुतच्या अपडेशनमुळे अर्ज भरण्यासाठी ॲपच सुरू होत नाही. सुरू झाले तर ‘ब्राऊझिंग’ बराच काळ सुरू राहते आणि त्यानंतर सर्व्हर डाउनचा फटका बसतो. यातून अंगणवाडी सेविकांसोबत अर्ज भरणारे, लाभार्थी महिलांचा बराच वेळ जातो आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांकडून अजून दोन - तीन दिवसांत अर्ज भरले जातील, असे आवाहन होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT