कोल्हापूर

दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

CD

फोटो ः 96049

दुचाकीवरून पडल्याने
महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः माणगाव फाट्यानजीक (ता. हातकणंगले) धावत्या दुचाकीवरून चक्कर येऊन पडल्याने रुक्मिणी पांडुरंग कांबळे (वय ५२, रा. टाकवडे, ता. शिरोळ) यांचा मृत्यू झाला. कसबा बावडा येथील नातेवाइकाचे निधन झाल्याने मुलासमवेत तिकडे जात असताना आज दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता दुपारी अडीचच्या सुमारास उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
कांबळे यांच्या कसबा बावडा येथील एका नातेवाइकाचे निधन झाले. रुक्मिणी कांबळे या त्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी मुलगा गंगाधर याच्या दुचाकीवरून शहराकडे येत होत्या. माणगावनजीक धावत्या दुचाकीवर त्यांना चक्कर आल्याने त्या तोल जाऊन खाली कोसळल्या. त्यांना तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असताना त्यांना मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT