कोल्हापूर

भूसख्खलन मंत्रालयात प्रश्‍न

CD

जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी कोणती कार्यवाही केली
आमदार सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या ८८ गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. याला मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील यांनी मानवी वस्तीजवळ असणाऱ्या १३ भूस्खलन ठिकाणांवर पहिल्या टप्प्यात भूस्खलन सौम्यीकरण कामासाठी ८३ कोटी १५ लाख रुपयांचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दिला असून, त्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात स्पष्ट केले.

आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे भूस्खलग्रस्त गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावातील नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी तसेच त्यांच्या स्थलांतरणासाठी कोणती कार्यवाही केली, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
यावर दिलेल्या लेखी उत्तरात मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिला आहे. या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन भूस्खलनाबाबतची माहिती घेतली आहे. यातील १३ ठिकाणे मानवी वस्तीपासून जवळ असल्याचे दिसून आले आहे. या सर्व ठिकाणी पावसाळ्यापूर्वी भूस्खलनाबाबत जनजागृती केली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला याबाबत पुन्हा एकदा सर्व्‍हे करून तांत्रिक अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीचा इशारा प्राप्त होताच या कुटुंबांना सुरक्षित निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT