कोल्हापूर

पोलिस भरतीची लेखी परीक्षा १३ जुलैला

CD

पोलिस भरतीची लेखी परीक्षा शनिवारी
विवेकानंद महाविद्यालयात व्यवस्था ः पोलिस चालक पदाची चाचणी समाप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रियेतील चालकपदाची चाचणी मंगळवारी समाप्त झाली. १९ ते २८ जून कालावधीत घेतलेल्या मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १३ जुलैला दुपारी ३ वाजता ताराबाई पार्कातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात होणार आहे. भरतीसाठी आलेल्या १२ हजार उमेदवारांतून १४९६ जण परीक्षेला पात्र ठरले आहेत.
जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या १५४ आणि चालक पदाच्या ५९ अशा २१३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ११ हजार ४४५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. १९ जूनपासून पोलिस कवायत मैदानावर धावणे, गोळाफेक, कागदपत्र पडताळणी करून शारीरिक चाचणी पूर्ण करण्यात आली, तर ३ ते ९ जुलै कालावधीत चालक पदासाठीची चाचणी घेतली.
परीक्षार्थींना लेखी परीक्षेसाठीचे हॉल तिकीट वितरण सुरू केले आहे. तरी उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazil vs Norway : ब्राझील वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर! Erling Haaland चे दोन भन्नाट गोल अन् नॉर्वेकडून १९९८ सालची पुनरावृत्ती...

Erling Haaland चा विक्रम! लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पेला भिडला अन् World Cup इतिहासात असे प्रथमच घडले, ५६ वर्षांत...

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

SCROLL FOR NEXT