कोल्हापूर

इचलकरंजीची वाटचाल पुन्हा स्वच्छतेकडे

CD

ich105.jpg
96220
इचलकरंजी : शहरात सर्वत्र असे कचऱ्याचे ढीग दिसत आहेत.
--------------
इचलकरंजीची वाटचाल पुन्हा स्वच्छतेकडे
महापालिका दोन निविदा काढणार : घरोघरी होणार कचरा संकलन
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : शहरात पुन्हा एकदा अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे वाटचाल होणार आहे. येत्या आठवड्याभरात दोन महत्त्वाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून याबाबतची गतीने कार्यवाही सुरू आहे. यामध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासह एकूण आठ वॉर्डातील स्वच्छतेचे काम खासगी पद्धतीने केले जाणार आहे. सुमारे १४ कोटींच्या दोन्ही कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत पुन्हा एकदा शहरातील स्वच्छतेबाबत सुसूत्रता येणार आहे.
सध्या शहरात आदर्श कंपनीच्या वतीने घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो. अन्य ठिकाणी साचलेला कचरा उठाव करण्याचे कामही या संस्थेकडे आहे. मुदत संपल्यानंतरही कंपनीला सतत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पाच वर्षे या कंपनीकडेच हे काम आहे. जुन्या दरामध्ये हे काम सुरू असल्यामुळे मक्तेदार कंपनीकडून कामामध्ये ढिलाई होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अलीकडे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उठाव केला जात नाही. याबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापलिका प्रशासनाकडून घरोघरी कचरा संकलन व उठाव करण्याच्या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या शिवाय विविध आठ वॉर्डातील स्वच्छतेच्या कामाचा मक्ता दिला जाणार आहे. यापूर्वी पाच वॉर्डात मक्ता पद्धतीने स्वच्छता केली जात होती. पण सध्या महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणखी तीन वॉर्डाची त्यामध्ये भर घातली आहे. या कामाचीही निविदा काढली जाणार आहे. ती पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही कामांसाठी तब्बल १४ कोटी वार्षिक खर्च प्रस्तावित केला आहे. १५ व्या वित्त आयोगातून अथवा महापालिका फंडातून या खर्चाची तरतूद केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
----------
त्रुटी शोधल्या, अटी घातल्या !
कचरा संकलित करण्याच्या कामाची निविदा काढतांना प्रशासनाने या वेळी विशेष दक्षता घेतली आहे. यामध्ये गत कामांतील त्रुटी शोधण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन निविदा काढतांना काही नवीन अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
---------
घंटागाड्यांना जीपीएस बसवणार
घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्याचे काम घंटागाड्याच्या माध्यमातून केले जाते. पण अनेकवेळा घंटागाड्या वेळेत जात नाहीत, अथवा दिलेला परिसर पूर्ण करीत नाहीत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येतात. आता मात्र नवीन निविदा काढताना घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे घंटागाडीचे लोकेशन व मार्ग समजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT