कोल्हापूर

‘आधार’ अपडेटच्या रांगेत थांबून पालक वैतागले

CD

‘आधार’ अपडेटच्या रांगेमुळे वैतागले पालक
विद्यार्थ्यांची शाळेला दांडी; किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः शैक्षणिक दाखले काढण्याची आणि लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची घाई सध्या आपले सरकार, महा ई-सेवा केंद्रांवर सुरू आहे. त्यातच शहरातील काही शाळांनी दोन ते तीन दिवसांत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यास पालकांना सांगितले आहे. त्यामुळे शाळेला दांडी मारून आधार अपडेटसाठी संबंधित केंद्रे आणि बँकांतील रांगेत विद्यार्थ्यांना थांबावे लागत असून पालकदेखील वैतागले आहेत. या अपडेटसाठी किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती आदी योजनांसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत (अपडेट) असणे बंधनकारक आहे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची आधार अपडेटसाठी शहरातील काही शाळांनी दोन ते तीन दिवसांची मुदत दिल्याने पालकांची धावपळ उडाली आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि अग्निवीरसारख्या भरती प्रक्रियेसाठी लागणारे दाखले काढणे, तसेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी नागरिकांची महा ई-सेवा केंद्र, राष्ट्रीयीकृत बँकेत सध्या गर्दी वाढत आहे. या दाखले, योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या पोर्टलवर अचानक भार वाढल्याने सर्व्हर डाऊनसारखी तांत्रिक समस्या वारंवार निर्माण होत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यास सांगितल्याने आणि त्याला देखील कमी मुदत दिल्याने विद्यार्थी, पालकांची धावपळ उडाली आहे. काही ठिकाणी तीन ते चार तास विद्यार्थी, पालकांना रांगेत थांबावे लागत आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेऊन शाळा आणि शिक्षण विभागाने किमान सहा महिने या आधार अपडेटसाठी मुदत वाढवावी अथवा शाळांनी स्वतः त्यासाठी शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी पालकांनी केली आहे.
...
शहरात पहिलीचे दहा हजार विद्यार्थी
यावर्षी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये १० हजार ३२३ विद्यार्थी, तर जिल्हा परिषदेकडून १९ हजार १८५ विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित झाले आहेत. त्यांच्या आधार अपडेटची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
...
कोट
‘महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील एकूण ९९ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया सुरू आहे. आधार अपडेटबाबत शहरातील ज्या शाळांना अडचण असेल त्यांनी प्राथमिक शिक्षण समितीशी संपर्क साधावा.
-एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती.
...
दाखले, आधार अपडेटचे वेळापत्रक ठरवावे
महा ई-सेवा केंद्रावर शैक्षणिक दाखले, शासनाच्या विविध योजनांच्या नोंदणीसाठी एकाच वेळी महिला, विद्यार्थी आदी नागरिकांची गर्दी वाढली आहे. अशा स्थितीत दाखले, आधार अपडेट आणि योजनांच्या नोंदणीसाठीचे शासनाने वेळापत्रक ठरवून द्यावे. प्रत्येकासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही महासेवा ई- केंद्र आणि आपले सरकार केंद्रचालकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT