कोल्हापूर

८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या बंगाली कारागीराला अटक

CD

फोटो
काशीनाथ पात्रा 96266

८४ तोळे सोन्यासह पसार झालेल्या
बंगाली कारागिराला अटक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः दागिने घडवून देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या सराफी पेढ्यांकडून घेतलेले ८४ तोळे सोने घेऊन पसार झालेल्या काशीनाथ बिधान पात्रा (वय ४०, रा. पश्चिम बंगाल) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. १५ फेब्रुवारी २०१४ ला पाच कामगारांसह तो गायब झाल्याने गुजरी परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
संशयित काशीनाथ पात्रा हा गुजरीतील कासार गल्लीत राहण्यास होता. येथे पाच कामगारांसोबत तो सोन्याचे दागिने बनवून देण्याचे काम करत होता. शहरातील सराफी पेढ्यांकडून चोख सोने घेऊन मजुरीच्या बदल्यात दागिने बनवत होता. अनेक वर्षांपासून कोल्हापुरात असल्याने सराफांचा त्याचावर विश्वास होता. सराफांनी त्याच्याकडे दिलेले ५३ लाख ६४ हजार रुपयांचे ८४ तोळे सोने घेऊन तो १४ फेब्रुवारीच्या रात्री निघून गेला. तो काम करत असलेल्या कारखान्याला कुलूप लावले होते. तसेच त्याचा भाऊ सोमन पात्रा, कारागीर शुभंकर माइती, बिटू, शंतनू, मॅनेजर सपन प्रामाणिक यांचेही मोबाईल बंद होते. यामुळे सराफांमध्ये घबराटीचे वातावरण होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित पसार होता. त्याला मंगळवारी रात्री अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT