कोल्हापूर

विशाळगड ऑनलाईऩ बैठक बातमी

CD

लोगो ः विशाळगड अतिक्रमण प्रश्‍न

न्यायालयीन प्रक्रियेची तयारी पूर्ण करा
सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रशासनाला सूचना; व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः विशाळगडावरील अतिक्रमणांचा प्रश्न न्यायालयात आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण करा. या काळात कायदा व सुव्यवस्था नीट राहील याची काळजी घ्या, अशा सूचना वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या.
विशाळगडावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नुकतीच तेथे महा आरती करून अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तेथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. मुंबईमधून संबंधित खात्याचे सचिव, पुरातत्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते, तर कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला मंत्री मुनगंटीवार यांनी या प्रकरणाशी संवंधीत सर्व न्यायालयीन कामाकाजाची माहिती घेतली. गडावर असणारी अतिक्रमणे, त्यांची व्यप्ती, शासकीय जमिनीची मालकी या संदर्भातील सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी करावी. न्यायालयीन खटल्यासाठी आवश्यक असणारी सर्व साधने, पुरावे, कागदपत्रे निर्धारीत वेळेत संकलीत करावीत. तसेच या कालावधीत विशाळगडावरील कयदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबत काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या.

चौकट
संभाजीराजे छत्रपतींना आवाहन
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी (ता.१४) विशाळगडावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन न करता प्रशासनाने केलेल्या कामांची माहिती घ्यावी. अतिक्रमणे काढण्याच्या दृष्टीने प्रशासन जे काम करत आहे ते समजून घ्यावे. त्यासाठी बैठकही घेण्यात येईल. अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT