कोल्हापूर

‘विज्ञान’च्या ३०९ विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची चौथी फेरी

CD

‘विज्ञान’च्या ३०९ विद्यार्थ्यांसाठी चौथी फेरी
अकरावी प्रवेश ः उद्या अर्ज करण्याचा दिवस; तिसऱ्या फेरीत ३८६५ जणांची निवड

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शहरातील विविध २९ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यमातील प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी आज जाहीर झाली. त्यात विज्ञानच्या ३३५५, तर वाणिज्यच्या सर्व ५१० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रवेशासाठी निवड झाली. विज्ञानच्या शिल्लक राहिलेल्या ३०९ विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची चौथी आणि अंतिम फेरी शनिवार (ता. १३) पासून राबविली जाणार आहे.
तिसऱ्या फेरीतील विज्ञानची प्रवेश क्षमता ३३५५, तर वाणिज्यची ६८८ इतकी होती. त्यात विज्ञानच्या ३६६४ आणि वाणिज्यच्या ५१० विद्यार्थ्यांनी प्रवेशाची मागणी केली. त्यांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी करून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने आज कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर निवड यादी जाहीर केली. त्यात एकूण ३८६५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यांनी प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही उद्या, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करावयाची आहे. तिसऱ्या फेरीत विज्ञान शाखेचा कटऑफ सरासरी दीड टक्क्यांनी, तर वाणिज्य इंग्रजीमध्ये डीआरके कॉमर्स कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज वगळता अन्य महाविद्यालयांचा कटऑफ दोन टक्क्यांनी घटला आहे.
........
चौकट
अंतिम फेरीचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज करणे -१३ जुलै
अर्जांची छाननी-१४ जुलै
निवड यादीची प्रसिद्धी-१५ जुलै
प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया-१५ आणि १६ जुलै
.......
चौकट.
फेरीनिहाय बदललेला ‘कटऑफ’
विज्ञान शाखा* पहिली फेरी* दुसरी फेरी* तिसरी फेरी
विवेकानंद कॉलेज*९२ टक्के*९१.८० टक्के*९१ टक्के
न्यू कॉलेज*९१*९१.४०*८८.८०
राजाराम कॉलेज*९०.४०*९०.४०*८८
एस. एम. लोहिया*८९.२०*९०.२०*८६.४०
-
वाणिज्य इंग्रजी शाखा* पहिली फेरी* दुसरी फेरी* तिसरी फेरी
डीआरके कॉमर्स कॉलेज*९१*९०.२०*९५
विवेकानंद कॉलेज*८६*८३.८०*७७.४०
डी. डी. शिंदे सरकार कॉलेज*८३.४०*७९.६०*७९.८०
.......
कोट
तिसऱ्या फेरीमध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश मिळाला नसलेल्या सर्व ३०९ विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये महाविद्यालय अलॉट केली आहेत. या फेरीनंतर इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे कोणतेही प्रवेश दिले जाणार नाहीत.
-स्मिता गौड, सचिव, केंद्रीय प्रवेश समिती
.......
चौकट
पहिल्या दिवशी ३२९ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती
प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी आज सकाळी दहा वाजता प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ३५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यात विज्ञान शाखेचे विद्यार्थी ३२९, तर वाणिज्य इंग्रजीच्या २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT