कोल्हापूर

प्रीपेड मीटर्स न लावण्याची कार्यवाही करा ः होगाडे

CD

प्रीपेड मीटर्स न लावण्याची
कार्यवाही करा : होगाडे
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ११ : सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर्स लावणार नाही, असे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले आहे. पण, केवळ आश्‍वासन नको, अंमलबजावणी करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ऊर्जामंत्री फडणवीस यांनी विधानसभेत व विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रामधील सर्वसामान्य घरगुती व ३०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक यांना प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार नाहीत, अशी घोषणा केली आहे. अशीच घोषणा त्यांनी यापूर्वी भाजपा पदाधिकारी बैठकीत केली होती. मात्र, आजअखेर यासंदर्भात अधिकृत निर्णय झालेला नाही. राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने सदरच्या निविदा रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे, अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप राज्य सरकारने अथवा महावितरणने जाहीर केलेली नाही. त्यामुळे केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून अशी वक्तव्ये होत आहेत की काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी फडणवीस यांनी त्वरित घोषणेची अधिकृतरीत्या अंमलबजावणी करावी. त्यासाठी महावितरण कंपनीस आदेश द्यावेत अथवा राज्य सरकारमार्फत शासन निर्णय करावा, अशी मागणी केली.
----------
दोन कोटी मिटरची ऑर्डर कशासाठी?
सद्य:स्थितीत प्रीपेड मीटर फक्त सबस्टेशन्स, फीडर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि सरकारी कार्यालये येथे लावली जातील, असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. या सर्व ठिकाणी सुमारे पंधरा लाख मीटर लागतील. प्रत्यक्षात मात्र सव्वा दोन कोटी मीटरची ऑर्डर का दिली गेली, याचे कारण उत्तरामध्ये त्यांनी कोठेही दिलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT