कोल्हापूर

आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवावी ः दिवटे

CD

आपत्कालीन यंत्रणा
सुसज्ज ठेवावी ः दिवटे
इचलकरंजी, ता. ११ः शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षांच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी शहरातील शासकीय विभागांचे सहकार्याने आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवावी, अशी सूचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केली. या संदर्भातील बैठक आज सकाळी महापालिकेत झाली.
उपायुक्त प्रसाद काटकर यांनी महापालिकेतर्फे केलेल्या पूर्वतयारीबाबतची सविस्तर माहिती विशद केली. आयुक्त दिवटे यांनी महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासह शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना दिल्या. पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, उपायुक्त स्मृती पाटील, सोमनाथ आढाव, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता शिवाजी पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी आदी उपस्थित होते.
-------------

ich113.jpg
96422
इचलकरंजी ः आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दुचाकीवरून शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

इचलकरंजीत आयुक्त दिवटेंची
दुचाकीवरून स्वच्छतेची पाहणी
इचलकरंजी, ता. ११ ः महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज सकाळी दुचाकीवरून शहरातील विविध भागांतील स्वच्छतेची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधताना कचरा गटारीत न टाकता घंटागाडीत टाकण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी बरेच दिवस गैरहजर असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना निलंबन करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना दिले.
काही दिवसांपासून शहरातील अस्वच्छतेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त दिवटे यांनी आज दुचाकीवरून फिरती केली. सकाळी आठ वाजता चहासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी सुटी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना दिवटे यांनी समज दिली. नागरिकांशी चर्चा करताना अनेक दिवस स्वच्छता केली नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी त्यांच्याकडे केली. अशा सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास दिल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा आयुक्त दिवटे यांनी दिला. यावेळी स्वच्छता निरीक्षक विजय पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT