कोल्हापूर

‘काडसिद्धेश्वर’, ‘संजीवन’ अंतिम फेरीत

CD

96495
कोल्हापूर : सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात संजीवन विरुद्ध पोदार विद्यालय यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
................
‘काडसिद्धेश्वर’, ‘संजीवन’ अंतिम फेरीत

सतरा वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी मुलींच्या फुटबॉल स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : महापालिकास्तरीय सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल मुलींच्या १७ वर्षांखालील स्पर्धेत श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल (कणेरी) व संजीवन विद्यानिकेतन (पन्हाळा) या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली.
तत्पूर्वी पहिल्या उपांत्य फेरीत संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा संघाने गिजवणे हायस्कूल गिजवणेवर पाच विरुद्ध शून्य गोलने एकतर्फी विजय मिळवला. संजीवनकडून पूर्वा भोसले दोन, कुमकुम, गुणगुण देवी, बसंतीपूजा यांनी प्रत्येकी एक गोल केला. ​दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल संघाने विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल पेठवडगाव संघावर चार विरुद्ध शून्य गोलने एकतर्फी विजय मिळवला. काडसिद्धेश्वर हायस्कूलकडून आदिती ढेरेने दोन, यशस्वी बेनाडे व समृद्धी ढेरे यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात गिजवणे हायस्कूल संघाने विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल संघावर तीन विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवला. गिजवणे हायस्कूलकडून रिया पाटीलने दोन, तर गौरी जगतापने एक गोल केला.
.....

स्पर्धेचा निकाल असा -
- गिजवणे हायस्कूल गिजवणेचा देवाळे हायस्कूल देवाळेवर एक विरुद्ध शून्यने गोल. गिजवणे हायस्कूलकडून नंदिनी मांडेकरचा एक गोल.
- संजीवन विद्यानिकेतन पन्हाळाचा आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाववर पाच विरुद्ध शून्य गोल. संजीवनकडून पूर्वा भोसले तीन, मेघा बाको दोन गोल.
- विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल पेठवडगावचे पोदार स्कूल यड्राववर दोन विरुद्ध शन्य गोल. विजयादेवी यादव स्कूलकडून इशिका जाधव, राजेश्वरी पाटील प्रत्येकी एक गोल.
- श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कणेरीचे गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोजवर चार विरुद्ध शून्य गोल. काडसिद्धेश्वर हायस्कूलकडून आर्या मेंगाणे दोन, साधना खाडे व आदिती ढेरे यांचे प्रत्येकी एक गोल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

SCROLL FOR NEXT