कोल्हापूर

राजकीय बातमी

CD

राज्यपाल नियुक्त आमदारांत कोल्हापूरला संधी

हाळवणकर यांच्या नावाची चर्चा ः इचलकरंजीची जागा सुरक्षित करण्याचा प्रयत्न

निवास चौगले : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः राज्यापालनियुक्त विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांपैकी एका जागेवर कोल्हापुरातून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या आठवडाभरात यावर शिक्कमोर्तब होणार आहे. विधानसभेच्या तोंडावर पक्ष विस्ताराचा भाग म्हणून कोल्हापूरला ही संधी दिली जात आहे.
सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा विधानसभा किंवा विधानपरिषदेचा एकही आमदार नाही. राज्यात महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व भाजप एकत्र आहेत. जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक यांच्या रूपाने राज्यसभेचा एकच खासदार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्ह्यातील असले तरी त्यांच्यावर कोथरूड विधानसभेची जबाबदारी असल्याने जिल्ह्यातील संपर्कावर त्यांच्याकडून मर्यादा पडतात. त्यामुळे पक्षाचा हक्काचा आमदार असेल तर कार्यकर्त्यांनाही राज्य पातळीवरील प्रश्‍नांचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. हा हेतू डोळ्यापुढे ठेवूनच राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक जागा कोल्हापुरात देण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.
विधानसभेसाठी भाजपकडून कोल्हापूर दक्षिण, उत्तर व इचलकरंजी या मतदारसंघांवर दावा सांगितला जात आहे. २०२९ च्या निवडणुकीत ‘उत्तर’ची जागा शिवसेनेकडे होती, पण त्यानंतर २०२२ च्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपला मिळाली व माजी नगरसेवक सत्यजित कदम हे उमेदवार होते. कदम यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी ७५ हजार मते घेतली, त्यातून भाजपचे बळ वाढले आणि म्हणूनच आगामी विधानसभेसाठी या जागेवर भाजपकडून दावा सांगितला जात आहे.
इचलकरंजीतून २०१९ च्या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे अपक्ष विजयी झाले व त्यांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला. आगामी निवडणुकीत आवाडे हेच महायुतीतील उमेदवारीचे प्रबळ दावेदार होऊ शकतात. त्यामुळे या मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची पंचाईत झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी हाळवणकर यांना विधानपरिषदेला पाठवून इचलकरंजीची जागा भाजपचे सहयोगी असलेल्या प्रकाश आवाडे यांच्यासाठी सुरक्षित करण्याचाही प्रयत्नही या माध्यमातून होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

SRH vs LSG: २६ वर ४ विकेट्स... शमी ऑन फायर! दोन चेंडूवर अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेडला धाडलं माघारी; इशानही स्वस्तात बाद, Video

अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

'मी आणि गुलजार यांनी एकमेकांना शॉर्टमध्ये जास्त बघितलंय' जुन्या ट्रोलिंगवर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या...'टेनिससाठी आम्ही...'

SCROLL FOR NEXT